मराठी चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचे काम करताना दिसत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपटांचे कौतुक होताना दिसत आहे. आशयघन मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील गर्दी खेचत आहेत. त्यासाठी मराठी कलाकार हे प्रचंड मेहनत घेत आहेत. नुकताच अभिनेता प्रथमेश परबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'होय महाराजा' असे म्हटले आहे. नेमकी काय आहे भानगड असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक अफलातून विनोदवीरांची मांदियाळी असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'होय महाराजा' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटाच्या घोषणा प्रथमेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. हा चित्रपट रसिकांचे संपूर्ण पैसे वसूल मनोरंजन करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाच्या नावावरुन चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.
वाचा: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा
'होय महाराजा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टीने केले आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब 'होय महाराजा' म्हणत या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करिअरच्या सुरुवातीपासून प्रथमेशने साकारलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि त्यामध्ये त्याला यश मिळवले आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत कुतूहल आहे.
वाचा: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल
'होय महाराजा' हा चित्रपट क्राईम-कॅामेडी प्रकारात मोडणारा आहे. एका अनोख्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. एक सर्वसामान्य तरुण आपल्या प्रेमाखातर कशा प्रकारे लढा देतो याची रोमांचक कहाणी 'होय महाराजा' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत अभिनेत्री अंकिता ए. लांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रथमेश आणि अंकितासोबत अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: 'ए भीडू' म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ
'होय महाराजा' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. गुरु ठाकूरने लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या संगीतकार जोडीचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी दिले आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे. फाईट मास्टर मोझेस फेर्नांडीस यांची अॅक्शन चित्रपटात पाहायला मिळणार असून, कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. जान्हवी सावंत सुर्वे यांनी वेशभूषा केली आहे.