मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prathamesh Parab Wedding: 'दगडू'च्या लग्नविधींना सुरुवात, हळद आणि मेहंदीचा व्हिडीओ व्हायरल

Prathamesh Parab Wedding: 'दगडू'च्या लग्नविधींना सुरुवात, हळद आणि मेहंदीचा व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 22, 2024 08:05 AM IST

Prathamesh Parab Wedding: अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Prathamesh Parab Wedding
Prathamesh Parab Wedding

Prathamesh Parab Haldi Photos: सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकताच लग्नबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता ‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब देखील आज बोहल्यावर चढणार आहे. दरम्यान, त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हळदी आणि मेहंदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रथमेश आणि क्षितिजाचा विवाहसोहळा २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. हळदी समारंभातील काही खास क्षण प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने हळदी समारंभात प्रचंड धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे प्रथमेश परबची होणारी बायको क्षितिजाने मेहंदी सोहळ्यातील सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नासाठी खास ‘प्रतिजा’ हा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. क्षितिजाच्या हातावरील मेहंदीवर प्रेक्षकांना ‘प्रतिजा’ या हॅशटॅगची झलक पाहायला मिळते.
वाचा: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा कमबॅक, दिसणार 'या' चित्रपटात

प्रथमेश आणि क्षितीजाची लव्हस्टोरी

‘टाईमपास’ या चित्रपटाने सगळ्याच अर्थाने प्रथमेशच्या आयुष्याला कलाटणी दिली होती. क्षितिजा आणि त्याच्या प्रेमकथेची सुरुवात देखील या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच झाली होती. खरंतर प्रथमेश परब यालाच क्षितिजा पहिल्यांदा आवडू लागली होती. मात्र, या नात्याची आणि प्रेमाची कबुली क्षितिजाने पहिल्यांदा दिली. क्षितिजा ही स्वतः एक चांगली लेखिका आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्षितिजा घोसाळकर हि देखील अभिनेत्री आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या दोघांची पहिली भेट झाली होती.

क्षितिजा घोसाळकर हिने तिच्या सोशल मीडियावर तिची एक सीरिज शेअर केली होती. तर, प्रथमेशला तिची सीरिज आणि त्यातील क्षितिजाचं लिखाण खूप आवडलं होतं. प्रथमेशने स्वतः तिला मेसेज करून आपली प्रतिक्रिया कळवली होती. मात्र, क्षितिजाने प्रथमेशचे मेसेजेस पाहिलेच नव्हते. म्हणून त्याने पुन्हा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिच्याशी संपर्क साधला. इथूनच त्यांच्यात संवादाला सुरुवात झाली होती. हळूहळू रोजच दोघांच्या गप्पा होऊ लागल्या. काहीच दिवसांत त्यांची छान मैत्री देखील झाली. मात्र, या गप्पा फोनवरूनच सुरू होत्या. त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती.

पहिल्यांदा झाली भेट

दरम्यानच्या काळात प्रथमेश परब याच्या ‘टाईमपास’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं. या चित्रपटाचं शूटिंग ठाण्यात सुरू असताना दोघांनी पहिल्यांदा भेटायचं ठरवलं होतं. भेटूया का? असं एकेमेकांना विचारल्यावर दोघांची उत्तरं हो असल्याने त्यांच्या पहिल्या भेटीला अखेर मुहूर्त सापडला. या पहिल्या भेटीतच क्षितिजाने प्रथमेशला आपल्या मनातील प्रश्न विचारून टाकला. ‘आपण रिलेशनशिपमध्ये येऊया का?’ असं पहिल्यांदा क्षितिजाने विचारलं. यावर प्रथमेशने देखील होकार दिला. आता त्यांची हिच प्यारवाली लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली आहे.

IPL_Entry_Point

विभाग