Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan Wedding: प्रेक्षकांची लाडकी लिटिल चॅम्प मुग्धा वैशंपायन नुकताच विवाह बंधनात अडकली आहे.
(1 / 5)
मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी लिटिल चॅम्प मुग्धा वैशंपायन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. तिने गायक प्रथेमश लघाटेशी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहे.
(2 / 5)
मुग्धाने सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
(3 / 5)
या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची काठाची साडी नेसली आहे. त्यावर छान अशी ज्वेलरी आणि केसात फुले माळली आहेत.
(4 / 5)
वधूच्या लूकमध्ये मुग्धा अतिशय सुंदर दिसत आहे.
(5 / 5)
तर दुसरीकडे प्रथमेशने देखील मुग्धाला मॅचिंग निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.