मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. त्यांना नाटकांचा बादशाह असे टोपण नाव देण्यात आले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक नाटके आणि सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा प्रशांत दामलेंच्या नाटकाचा चाहता आहे. त्यांनी आतापर्यंत १२५०० पेक्षा जास्त नाटकाचे प्रयोग केले आहेत. आता नुकताच त्यांनी एका चाहत्याला दिलेले मजेशीर उत्तर सर्वांचे लक्ष वेधून दिसत आहे.
प्रशांत दामले हे सोशल मीडियावर देखील प्रचंड असतात. त्यांच्या आगामी नाटकाविषयी असो किंवा आणखी काही गोष्ट ते थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करताना दिसतात. आता ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी नाटकाच्या तिकिटांसाठी 'तिकिटालय' हे स्वतंत्र्य अॅपही सुरु केले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रेक्षकांना तिकिट काढणे सोपे झाले आहे. अनेकांनी प्रशांत दामले यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
वाचा: पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला
नुकताच प्रशांत दामले यांनी एका नाटकाची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी "एका लग्नाची पुढची गोष्ट.. कुठेही बसा पण हसा लगेच TICKEYALAY डाउनलोड करा. गुरु 4 एप्रिल दु 4 दिनानाथ नाट्यगृह, शनी 6 एप्रिल रा 9.30 कालिदास नाट्यगृह नाशिक, रवी 7 एप्रिल दु 12.30 बालगंधर्व रंगमंदिर पुणे
रवी 7 एप्रिल सं 5.30 साठे सभागृह पुणे" असे म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर एका चाहत्याने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेमध्ये नवे रंजक वळण
प्रशांत दामले यांनी केलेल्या पोस्टवर नुकताच एका यूजरने 'सर गंमत म्हणून विचारत आहे, अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो?' असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी 'नाटक पण अर्धच बघता येईल' असे मजेशीर उत्तर दिले आहे. सध्या सोशल मीडियावर प्रशांत दामलेंनी दिलेल्या या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: ‘या’ सेलिब्रिटीने घेतलं ईशा अंबानी-आनंद पिरामल याचं अमेरिकेतील घर, ५०० कोटी रुपयांचा केला करार
प्रशांत दामले हे सध्या 'सारखंच काही तरी होतय' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकांच्या प्रयोगामध्ये व्यग्र आहेत. तसेच त्यांची 'तू म्हणशील तसं' आणि 'नियम व अटी लागू' ही दोन नाटके चर्चेत आहेत. या दोन नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे.