मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prasad Oak Wife: नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसाद ओकच्या पत्नीला ट्रेनमधून ढकललं! नेमकं काय घडलेलं?

Prasad Oak Wife: नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसाद ओकच्या पत्नीला ट्रेनमधून ढकललं! नेमकं काय घडलेलं?

Feb 05, 2024 03:13 PM IST

Prasad Oak Wife Manjiri Oak: प्रसाद ओक यांची पत्नी निर्माती मंजिरी ओक हिने नुकतीच एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्या संघर्षकाळाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

Prasad Oak Wife Manjiri Oak
Prasad Oak Wife Manjiri Oak

Prasad Oak Wife Manjiri Oak: अभिनेता प्रसाद ओक सध्या त्याच्या आगामी ‘धर्मवीर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. अभिनेता असण्यासोबतच प्रसाद ओक निर्माता आणि दिग्दर्शक देखील झाला आहे. त्याच्या या प्रवासात त्याची पत्नी मंजिरी ओक हे देखील खांद्याला खांदा लावून साथ देत आहे. प्रसाद ओकच्या आजवरच्या प्रवासात मंजिरी ओक नेहमीच त्याच्यामागे खंबीरपणे उभी राहिली आहे. या प्रवासात त्यांना अनेक संघर्ष करावे लागले. मात्र, त्यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंजिरी ओक हिने आपल्या संघर्षाच्या काळातील एक धक्कादायक घटना सांगितली आहे.

प्रसाद ओक यांची पत्नी निर्माती मंजिरी ओक हिने नुकतीच एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्या संघर्षकाळाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. प्रसाद ओक आणि मंजिरी यांचं लग्न झालं तेव्हा, मंजिरी स्वतः नोकरी करत होती. या काळात दोघेही एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचं हे घर विरारमध्ये होते. मंजिरी आणि प्रसाद दोघेही विरारहून ये-जा करायचे. लग्नाच्या २ वर्षांनंतर प्रसाद आणि मंजिरी यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. मात्र, या दरम्यान मंजिरीसोबत एक अतिशय धक्कादायक घटना घडली होती.

12th Fail Collection: ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालतोय विक्रांत मेस्सीचा चित्रपट!

… अन् ट्रेनमधून खाली पडली मंजिरी ओक!

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत मंजिरी ओक एका मार्केटिंग कंपनीत काम करत होती. कामाच्या निमित्ताने तिला विरारहून रोज ये-जा करावी लागत होती. गच्च भरलेल्या ट्रेनमधून रोज धक्के खात मंजिरी प्रवास करायची. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळेस मंजिरी अगदी नवव्या महिन्यापर्यंत रोज प्रवास करत नोकरीसाठी जात होती. मात्र, नवव्या महिन्यात अशाच एका दिवशी ट्रेनमधून येताना गर्दीच्या वेळी मंजिरीला ट्रेनमधून ढकलून देण्यात आलं होतं. त्यावेळी मंजिरीचा नववा महिना पूर्ण झाला होता. कधीही बाळाचा जन्म होणार होता. सुदैवाने मंजिरीच्या पोटातील बाळाला काही इजा झाली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

२३ वर्षांनंतर मंजिरी ओकचं कमबॅक

घरी येऊन मंजिरीने हा सगळा प्रसंग प्रसाद ओकला सांगितला. यावेळी प्रसादला देखील मोठा धक्का बसला होता. मात्र, प्रसादने मंजिरीला ‘तू इथून पुढे नोकरी करायची नाहीस, आराम करायचा’ असं म्हणत स्वतःची काळजी घेण्याची तंबी दिली होती. त्यावेळी दूरदर्शन आणि सह्याद्री याच वाहिन्या होत्या. मात्र, प्रसाद काम करत असलेल्या काही मालिका त्यावेळी गाजत होत्या. त्यामुळे येणाऱ्या पैशातून काटकसर करून घर चालवू असा निर्णय घेऊन मंजिरीने पूर्णवेळ घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली. तब्बल २२-२३ वर्षांनंतर मंजिरीने ‘हिरकणी’ या चित्रपटापासून आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली.

WhatsApp channel