Dharmaveer 2 Poster: ‘साहेबां’च्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार; सुरू होणार 'धर्मवीर २'चा प्रवास!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmaveer 2 Poster: ‘साहेबां’च्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार; सुरू होणार 'धर्मवीर २'चा प्रवास!

Dharmaveer 2 Poster: ‘साहेबां’च्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार; सुरू होणार 'धर्मवीर २'चा प्रवास!

Updated Nov 27, 2023 04:04 PM IST

Dharmaveer 2 Motion Poster Out: नुकताच 'धर्मवीर २' या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. यानंतर लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Dharmaveer 2 Poster
Dharmaveer 2 Poster

Dharmaveer 2 Motion Poster Out: स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यातील एका प्रवासाची झलक दाखवणारा 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसचं नाही तर, प्रेक्षकांच्या मनावर देखील गारुड केले होते. या चित्रपटाला तुफान यश मिळाल्यानंतर 'धर्मवीर'चा सिक्वेल येणार, याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. 'धर्मवीर २'ची घोषणा होताच चाहते देखील या चित्रपटासाठी आतुर झाले होते. या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहते लक्ष ठेवून होते. अखेर आता या प्रवासाची सुरुवात होणार आहे. नुकताच 'धर्मवीर २' या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. यानंतर लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यानंतरच 'धर्मवीर २'ची घोषणा झाली होती. आता या चित्रपटाच्या प्रवासाचा शुभारंभ झाला आहे. नुकताच 'धर्मवीर २' या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. या मुहूर्त सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यात 'धर्मवीर २' या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Filmfare OTT Awards 2023 : एक-दोन नव्हे 'या' वेब सीरिजने पटकावले ९ पुरस्कार! पाहा विजेत्यांची यादी...

'धर्मवीर २' चित्रपटाच्या या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर 'धर्मवीर २' आणि 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट....' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट....' या टॅगलाईनमुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. आता 'धर्मवीर २' या चित्रपटात कोण कोणते कलाकार असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 'धर्मवीर २' या चित्रपटातून 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' उलगडली जाणार म्हणजे नक्की काय घडणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील लागली आहे. मात्र, यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे 'धर्मवीर २' चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. तर, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून, अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे.

Whats_app_banner