Dharmaveer 2: 'धर्मवीर २'साठी प्रसाद ओक यानं कमी केलं 'इतकं' वजन! म्हणाला..
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmaveer 2: 'धर्मवीर २'साठी प्रसाद ओक यानं कमी केलं 'इतकं' वजन! म्हणाला..

Dharmaveer 2: 'धर्मवीर २'साठी प्रसाद ओक यानं कमी केलं 'इतकं' वजन! म्हणाला..

Published Nov 29, 2023 10:26 AM IST

Prasad Oak Weight Loss: 'धर्मवीर २' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याने आपण या भूमिकेसाठी वजन कमी केल्याचं म्हटलं आहे.

Prasad Oak Weight Loss
Prasad Oak Weight Loss

Prasad Oak Weight Loss: मराठी अभिनेता प्रसाद ओक लवकरच 'धर्मवीर २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. या वेळी 'धर्मवीर २' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याने आपण या भूमिकेसाठी वजन कमी केल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटासाठी प्रसाद ओकने तब्बल ६ ते ७ किलो वजन कमी केले आहे. ही किमया त्याने गेल्या महिनाभरात साध्या केली आहे.

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी प्रसाद ओकणे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने या दुसऱ्या भागावर घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं. या चित्रपटासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ते म्हणजे अभिनेत्याचं वजन... या भूमिकेत चपखल बसण्यासाठी प्रसाद ओक याला भरपूर वजन कमी करावे लागले होते.

Salman Khan Security: लॉरेन्स बिश्नोईच्या नव्या धमकीनंतर पोलीस सतर्क; सलमानच्या सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय!

याबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणाला की, ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागावेळीही त्याला वजन बरंच वाढवावं लागलं होतं. तर, नंतर ते कमीही करावं लागलं होतं. आता या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी देखील प्रसाद ओक याला स्वतःचं वजन घाटवावं लागलं होतं. यासाठी प्रसाद ओक याने आधीच सुरुवात केली आहे. या भूमिकेसाठी अगोदरच प्रसाद ओक याने ६ ते ७ किलो वजन कमी केलं आहे. तर, या भूमिकेसाठी त्याला अजून १ ते २ किलो वजन कमी करावं लागणार आहे. 'दिघे साहेबांचा वेष धारण केल्यानंतर तो आपल्याला शोभला देखील पाहिजे. त्यामुळे या चित्रपटासाठी वजन कमी करणं खूप गरजेचं होतं', असं प्रसाद ओक म्हणाला.

मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे 'धर्मवीर २' चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. 'धर्मवीर २' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विठ्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून, अन्य कलाकरांची नावे अद्याप गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.

Whats_app_banner