मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prasad Oak Birthday: ‘फोटोत तोंड बंद आहे म्हणून...’; प्रसाद ओकच्या वाढदिवशी पत्नी मंजिरीची खास पोस्ट चर्चेत!

Prasad Oak Birthday: ‘फोटोत तोंड बंद आहे म्हणून...’; प्रसाद ओकच्या वाढदिवशी पत्नी मंजिरीची खास पोस्ट चर्चेत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 17, 2024 02:25 PM IST

Prasad Oak Birthday Post: अभिनेता प्रसाद ओक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या पत्नीने अर्थात मंजिरी ओक हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

Prasad Oak Birthday Post
Prasad Oak Birthday Post

Prasad Oak Birthday Post: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याचा आज (१७ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर आलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान आता त्याची पत्नी मंजिरी ओक हिने देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. मंजिरी ओक हिची ही खास बर्थडे पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या पतीला अर्थात अभिनेता प्रसाद ओक याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा गंमतीशीर अंदाज त्यांच्या चाहत्यांना देखील आवडला आहे.

अभिनेता प्रसाद ओक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या पत्नीने अर्थात मंजिरी ओक हिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने प्रसादसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंजिरीने तोंडावर मास्क लावला आहे. तर, प्रसाद ओक याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. या फोटोसोबत कॅप्शन लिहिताना मंजिरीने लिहिलं की, ‘प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन, गप्प बसेन, तुला बोलू देईन, मी फक्त ऐकेन. तर जागा हो. फोटो आहे तो, मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते… तुला पर्याय नाही... ओह सॉरी सॉरी आज चांगलं बोलायचं असतं ना? ओके ओके, आय लव्ह यु. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो... वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!’

Prajakta Mali: ‘भक्षक’ पहिल्यानंतर प्राजक्ता माळीने दिली बालिकाश्रमाला भेट! पोस्ट लिहित चाहत्यांना केलं आवाहन

चाहते आणि कलाकारांकडूनही प्रतिक्रिया

मंजिरी ओक हिच्या या पोस्टवर आता चाहते आणि इतर कलाकार मंडळी देखील भरभरून कमेंट्स केल्या आहेत. पत्नीच्या या पोस्टवर कमेंट करत प्रसाद ओकने तिला ‘आय लव्ह यु टू’ म्हटलं आहे. अमित फाळके, सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत प्रसाद ओक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहते देखील या पोस्टवर भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने शुभेच्छा देताना लिहिले की, ‘परफेक्ट भारतीय बायकोचे हक्काचे विधान देऊन शुभेच्छा दिल्यात मॅडम... हा हा खूप आवडलं.. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रसाद ओक सर’.

तर, आणखी काही चाहत्यांनी प्रसाद ओक याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मनोरंजन विश्वात देखील ही जोडी खूप गाजते आहे.

IPL_Entry_Point