मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prakash Raj: ही नवीन ‘नग्नता’ का?; मोदींचे फोटो शेअर करत प्रकाश राज यांचे ट्वीट

Prakash Raj: ही नवीन ‘नग्नता’ का?; मोदींचे फोटो शेअर करत प्रकाश राज यांचे ट्वीट

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 05, 2022 04:47 PM IST

Prakash Raj taunts Narendra Modi: प्रकाश राज यांनी केलेल्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी यांच्या २० फोटोंचे कोलाज आहे.

प्रकाश राज
प्रकाश राज (HT)

Prakash Raj taunts Narendra Modi: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते प्रकाश राज हे सतत त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकताच प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगवेगळ्या पारंपरिक लूकमधील काही फोटो शेअर करत खिल्ली उडवली आहे. त्यांचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदी यांच्या २० फोटोंचे कोलाज शेअर केले आहे. हे कोलाज शेअर करत त्यांनी, 'अती कपडे परिधान करणे ही नग्नत्व झाकण्याची नवीन पद्धत (आहे का?)' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या प्रकाश राज यांचे हे ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे.
वाचा: अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये लागली आग, मुलीने मारली खिडकीतून उडी

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोदींनी डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या आणि वस्त्र गुंडाळलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी नागवेपण झाकण्यासाठी अशापद्धतीने नटून थटून मिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या कॅप्शनमध्ये न्यूडीटी हा शब्द अपयश झाकणे या अर्थाने वापरण्यात आला आहे.

प्रकाश राज यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने प्रकाश राज यांच्या चित्रपटातील सीन शेअर करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, 'तुम्ही काहीही बोलत आहात' असे कॅप्शन दिले आहे.

प्रकाश राज हे सतत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. यापूर्वी त्यांनी मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये काँग्रेसच्या राजवटीत युरियाचा प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी “आता सगळीकडे भ्रष्टाचार आहे. ४०%… ३०%.. २०% प्रमाणे” या आशयाचे कॅप्शन दिले होते.

IPL_Entry_Point

विभाग