मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali: ‘भक्षक’ पहिल्यानंतर प्राजक्ता माळीने दिली बालिकाश्रमाला भेट! पोस्ट लिहित चाहत्यांना केलं आवाहन

Prajakta Mali: ‘भक्षक’ पहिल्यानंतर प्राजक्ता माळीने दिली बालिकाश्रमाला भेट! पोस्ट लिहित चाहत्यांना केलं आवाहन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 17, 2024 01:46 PM IST

Prajakta Mali Visit Baalikashram: ‘भक्षक’ हा चित्रपट पहिल्यानंतर आता प्राजक्ता माळी हिने एका बालिका आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट दिल्यानंतर आता तिने चाहत्यांना देखील एक आवाहन केलं आहे.

Prajakta Mali Visit Baalikashram
Prajakta Mali Visit Baalikashram

Prajakta Mali Visit Baalikashram: बॉलिवूडची दमदार अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा ‘भक्षक’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भक्षक’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून एक हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील नुकताच ‘भक्षक’ हा चित्रपट पाहिला आहे. ‘भक्षक’ हा चित्रपट पहिल्यानंतर आता प्राजक्ता माळी हिने एका बालिका आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट दिल्यानंतर आता तिने चाहत्यांना देखील एक आवाहन केलं आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडिया हा चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी अत्यंत प्रभावी मध्यम आहे. कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हि देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यासोबतच तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे.

Lal Salaam Collection: रजनीकांत यांची जादू पडली फिकी! ‘लाल सलाम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘२ दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘भक्षक’ सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला. कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं. सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील, तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. - नियम व अटी लागू.) संपर्क - ९८८११५२१३९ - गौतम. भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.’

‘भक्षक’ या चित्रपटात मुलींच्या तस्करीचं कथानक पाहायला मिळालं आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर एका धाकेबाज पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचं कथानक पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळी भारावून गेली आहे.

IPL_Entry_Point