Prajakta Mali Personal Life: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेली मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या हास्याच्या स्टाइलने तर सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्ताने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण एक काळ असा होता जेव्हा प्राजक्ता जवळपास नैराश्यामध्ये गेली होती. तिच्या खासगी आयुष्यात सुरु असलेल्या वादळाचा तिच्या कामावर देखील परिणाम होत होता.
प्राजक्ता एका अभिनेत्याला डेट करत होती. पण एक दिवस अचानक तिचा ब्रेकअप झाला. पण जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा प्राजक्ता एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. या चित्रपटाच्या सेटवर ती तिच्या तिच्या धुंदीत होती. याविषयी तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
वाचा: अरिजीत सिंहला पाहून रिंकूने असे काही केले की नेटकरीही झाले चकीत
प्राजक्ता माळीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. तिने बेक्रअपविषयी बोलताना म्हटले की, "'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान माझं ब्रेकअप होत होतं. त्यामुळे माझ्यासोबत काय सुरु आहे काही मला समजत नव्हतं. आता मला सांगतात की तो सिन करताना तू पडली होती. पण मला ते आठवत नाही. तेव्हा मी माझ्याच झोनमध्ये होते."
वाचा: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर
प्राजक्ताने 'जुळून येती रेशीम गाठी' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिच्या ही मालिका तुफान गाजली होती. तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले होते. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.