क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जात आहे. वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. दरम्यान, भारताच्या विजयासाठी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने देवाकडे साकडे घातले आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने गणपती बाप्पाकडे साकडे घातले आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोली कॅप्शन देताना तिने भारतीय टीमसाठी प्रार्थना केली आहे. 'आजची match जिंकू दे रे देवा…' असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे.
वाचा: अमेरिकेत राहणाऱ्या प्रियांकाने विकले मुंबईतील घर, 'या' दिग्दर्शकाने केले खरेदी
भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते. त्याचवेळी कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. आता २० वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येणार आहेत. २००३ वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा १२४ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय फॉर्मेटमध्ये एकूण १५० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ८३ आणि भारताने ५७ सामने जिंकले आहेत. तर यातील १० सामन्यांचा निकाल लागला नाही. आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्या हिताची आहे यात शंका नाही. पण टीम इंडिया सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता भारताला हरवणे केवळ कठीणच नाही तर जवळजवळ अशक्य आहे.