मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तेव्हा माझा ब्रेकअप झालेला आणि मी माझ्याच विचारात...' प्राजक्ता माळीचा खुलासा
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी
15 June 2022, 15:44 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
15 June 2022, 15:44 IST
  • (prajakta mali)मात्र प्राजक्ताने नुकत्याच केलेल्या एका खुलाशाने ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. गेले काही दिवस प्राजक्ता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेश येथे गेली होती. तिथले अनेक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. तर दुसरीकडे तिच्या 'वाय' या चित्रपटाची चर्चा आहे. अजित वाडीकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'वाय' चित्रपट २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत मुक्ता बर्वे, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, नंदू माधव हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. मात्र प्राजक्ताने नुकत्याच केलेल्या एका खुलाशाने ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. 'वाय च्या चित्रीकरणादरम्यान आपला ब्रेकअप झाला होता असा खुलासा तिने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या चित्रपटासाठी प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने हा खुलासा केला. त्यावेळेस सामोऱ्या गेलेल्या प्रसंगांना आठवत प्राजक्ता म्हणाली, ''वाय' चित्रपटात माझी भूमिका छोटी आहे पण तितकीच महत्वाची आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोष्टी घडत होत्या. ती परिस्थिती वेगळी होती. तेव्हा माझं ब्रेकअप झालं होतं. मी कुठे आहे, कशी वागतेय, माझं काय चाललंय याची कशाचीच जाणीव मला नव्हती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या कितीतरी गोष्टी मला आठवतही नाहीत. जेव्हा आम्ही नंतर चित्रपट पाहायला घेतला तेव्हा दिग्दर्शक मला सांगत होते की तुला आठवतंय का इथे तू पडली होतीस, इथे हा सीन करताना तू असं म्हटलं होतंस आणि मी त्यांना फक्त हो म्हणत होते. मला त्या गोष्टी अजिबात आठवत नव्हत्या. मी माझ्याच विचारात होते.'

पुढे प्राजक्ता म्हणाली, ' पण मी हा चित्रपट निवडला याचा मला अभिमान वाटला. चित्रपटाचा विषय खूप छान आहे. आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडतायत यावर तुमचाही विश्वास बसणार नाही.' प्राजक्ता सध्या निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु, तिच्या ब्रेकअपच्या बातमीने अनेक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.