Prajakta Mali: प्राजक्ता माळीने घेतली नितीन गडकरींची भेट, पोस्ट शेअर करत म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali: प्राजक्ता माळीने घेतली नितीन गडकरींची भेट, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने घेतली नितीन गडकरींची भेट, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 25, 2023 04:21 PM IST

Prajakta Mali Social media Post: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आहे. ती राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांची भेट घेताना दिसत आहे.

Prajakta Mali
Prajakta Mali

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ती राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता राजकीय वर्तुळातील व्यक्तींची भेट घेताना किंवा राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसत आहे. अशातच तिची नवी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्राजक्ता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच प्राजक्ताने एका कार्यक्रमाच्या आयोजकांशी समन्वय साधून नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा संपूर्ण अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वाचा: प्रेमाची बहार अन् क्रांतीचा एल्गार जगाला दाखवणारे साहिर लुधियानवी! वाचा....

काय आहे प्राजक्ताची सोशल मीडिया पोस्ट?

मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. आयोजकांना म्हटलं, सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’…अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला..निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहिली गेलेली ८-९ पुस्तकं दिली, नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. ) आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार.

यापूर्वी प्राजक्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावली होती. तिने अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती दर्शवली होती. तिचे मंचावरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. आता नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर प्राजक्ता राजकारणात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Whats_app_banner