Prajakta Mali Makes Special Announcement: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्राजक्ता माळी केवळ अभिनयच नव्हे, तर आता उद्योजिका म्हणून देखील ती खूप प्रसिद्ध झाली आहे. प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर देखील तगडी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.प्राजक्ता माळीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी देखील तिचे चाहते खूप आतुर असतात. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्राजक्ता माळी हिने खास गुडन्यूज दिली आहे. आता प्राजक्ता माळी हिच्या चाहत्यांना तिच्या कर्जत येथील फार्महाऊसमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. नुकतीच प्राजक्ता माळी हिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’चंनिमित्त साधून प्राजक्ता माळी हिने तिच्या फार्महाऊसचा एक खास व्हिडीओसोशल मीडियावर शेअर केला आहे.या आलिशान फार्महाऊसचा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की,‘यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन दिनाच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.प्रेम करू नका, पण प्रेम व्हा हे ब्रीदवाक्य स्मरणी आहेच.’या सोबतच तिने‘एकला चलो रे’ असा हॅशटॅगही दिला आहे. प्राजक्ता माळी हिने काहीच दिवसांपूर्वी एक आलिशान फार्महाऊस विकत घेतलं आहे. कर्जतमधील या फार्महाऊसमध्ये तिने आता चाहत्यांना राहण्याची संधी दिली आहे. अर्थात आता तिने टुरिझम क्षेत्रात देखील एन्ट्री केली आहे.
प्राजक्ता माळी हिच्या कर्जतमधील या फार्म हाऊसमध्ये म्हणजेच ‘प्राजक्तकुंज’मध्ये राहण्यासाठी प्राजक्ताने एक नवी वेबसाईट लाँच केली आहे. या वेब साईटवरून ‘प्राजक्तकुंज’चं बुकिंग करता येणार आहे.‘व्हॅलेंटाईन डे’चंनिमित्त साधून प्राजक्ता माळी हिने ही वेब साईट लाँच केली आहे. काहीच महिन्यांपूर्वी प्राजक्ता माळी हिने हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर घर विकत घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट नुसार,तिच्या या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या टुमदार फार्महाऊसची किंमत कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.प्राजक्ता माळीने आपल्या स्वःबळावर कर्ज काढून हे घर विकत घेतले आहे.
प्राजक्ता माळी हिला स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं. केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर, आत्मिक समाधान म्हणून आपण हे घर खरेदी केल्याचे तिने म्हटले होते. ‘खरंतर एवढं मोठं घर घ्यायचा विचार नव्हता. तितकं बजेटही नव्हतं. पण, मी ते घर पाहिलं आणि त्याच्या प्रेमातच पडले. या घराच्या आजुबाजूला सगळीकडे हिरवळ आणि डोंगर पाहून मन प्रसन्न झालं. डोंगराच्या कुशीतून वाहणारे धबधबे पाहून आणि त्यांचा आवाज ऐकून खूप शांत वाटलं, म्हणून हा अट्टहास...’, असं प्राजक्ता म्हणाली होती.