Prajakta Mali: परदेशात आलोक राजवाडेवर आली प्राजक्ता माळीकडून पैसे घेण्याची वेळ, काय आहे प्रकरण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali: परदेशात आलोक राजवाडेवर आली प्राजक्ता माळीकडून पैसे घेण्याची वेळ, काय आहे प्रकरण?

Prajakta Mali: परदेशात आलोक राजवाडेवर आली प्राजक्ता माळीकडून पैसे घेण्याची वेळ, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 25, 2023 02:35 PM IST

Prajakta Mali: एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. तेव्हा हा किस्सा घडला आहे.

Prajakta Mali
Prajakta Mali

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. लवकरच प्राजक्ताचा 'तीन अडकून सिताराम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. त्यादरम्यानचा किस्सा प्राजक्ताने नुकताच सांगितला आहे. तिने लंडनमध्ये

हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. लंडनला चित्रीकरणासाठी जाण्यासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक होती आणि यासाठी दोन कारणे होती. एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होते यासाठी आणि दुसरे म्हणजे तिला सौंदर्यप्रसाधनांची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती भरपूर पैसेही घेऊन गेली होती. मात्र तिची निराशा झाली. ज्या उद्देशाने ती एवढे पैसे घेऊन गेली त्याचा फारसा उपयोगच झाला नाही. तिला चित्रीकरणातून वेळच मिळाला नाही त्यामुळे तिला मनासारखी खरेदीही करता आली नाही. नेमके त्याच वेळी आलोक राजवाडेचे कार्ड बंद पडल्याने आणि प्राजक्ताकडे भरपूर पैसे उरल्याने तिने ते पैसे आलोकला दिले.
वाचा: लग्न कधी करणार?; प्राजक्ता माळीने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

याबद्दल प्राजक्ता माळी म्हणते, "मला लंडनमध्ये खूप खरेदी करायची होती. परंतु माझे चित्रीकरणाचे शेड्युल असे होते, की मला खरेदीसाठी वेळच मिळायचा नाही. माझा शॉट अर्धा तासासाठी असला तरी माझा पूर्ण दिवस जायचा. अखेर जायच्या आधी मला केवळ अर्धा दिवस शॉपिंगसाठी मिळाला. त्यात मी माझ्या भाच्यांसाठी आणि जमेल त्या वस्तू खरेदी केल्या. मनासारखी खरेदी न झाल्याने माझे बरेच पैसे उरले. त्यात आलोकला गरज होती म्हणून मी माझ्याकडचे पैसे दिले. अर्थात आलोकने ते पैसे परत केले."

'तीन अडकून सीताराम' या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे,आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Whats_app_banner