Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी राजकारणात एन्ट्री घेणार? 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी राजकारणात एन्ट्री घेणार? 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण!

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी राजकारणात एन्ट्री घेणार? 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण!

Oct 23, 2023 09:36 AM IST

Prajakta Mali Entry In Politics: लवकरच प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली आहे. प्राजक्ताचे चाहते देखील यावर चर्चा करत आहे.

Prajakta Mali Entry In Politics
Prajakta Mali Entry In Politics

Prajakta Mali Entry In Politics: आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता अनेक क्षेत्रांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी आपला कविता संग्रह प्रकाशित केला होता. तर, त्यानंतर तिने 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू करत व्यवसाय क्षेत्रात देखील पदार्पण केले होते. आता प्राजक्ताने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली आहे. प्राजक्ताचे चाहते देखील यावर चर्चा करत आहे. या सगळ्याची सुरुवात प्राजक्ताने शेअर केलेल्या एका फोटोमुळे झाली आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने प्राजक्ता माळी हिने वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत अनेक कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान प्राजक्ताने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील काही फोटो प्राजक्ता माळी हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या सोबतच तिने एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमुळे आता चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. अभिनेत्री आता राजकारणात येणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या पोस्टमधून तिने स्वतःच याचे संकेत दिले आहेत.

Prabhas Birthday: 'बाहुबली' प्रभासला कधी अभिनेता बनायचं नव्हतं! 'या' क्षेत्राची होती आवड...

अभिनेत्री प्राजक्ता हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलं की, ‘महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य... की आयुष्यभरासाठीची मैत्रीण?, मा. आदिती ताई तटकरे. स्वतः एक स्त्री आणि नाव “आदिती”च असल्याने महिलांचे प्रश्न जाणून स्त्री शक्तीस आधार देणारं खंबीर, झंझावाती नेतृत्व त्यांच्यात आहेच. अतिशय लक्षवेधी, दयाळू स्वभाव आणि निर्णयक्षमता हे त्यांच्यातील गुण मला खूप प्रेरणा देतात. त्यांना जवळून ओळखून खूप आनंद होत आहे. काल रात्री आम्ही धमाल केली. आमचे विचार खूप जुळतात. आता आपण वरचेवर भेटलं पाहिजे आणि महिला सुरक्षा, सक्षमीकरणासाठी एकत्र काम केलं पाहिजे. आपण करूया ना?’

प्राजक्ता माळी हिने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आदिती तटकरे यांना देखील टॅग केली आहे. या आधी प्राजक्ता माळी मनसे पक्षासोबतही काम करताना दिसली होती. त्यामुळे प्राजक्ता राजकारणात कधी प्रवेश करेल? आणि नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करेल? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Whats_app_banner