Phullwanti: प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा हिट की फ्लॉप? वाचा ५ दिवसांचे कलेक्शन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Phullwanti: प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा हिट की फ्लॉप? वाचा ५ दिवसांचे कलेक्शन

Phullwanti: प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा हिट की फ्लॉप? वाचा ५ दिवसांचे कलेक्शन

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 16, 2024 04:50 PM IST

Phullwanti Movie Box Office Collection: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता हा चित्रपट हिट ठरला की फ्लॉप हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Phullwanti
Phullwanti

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील एक आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा या ‘फुलवंती’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की फ्लॉप हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘फुलवंती’ चित्रपटात पेशवाई काळातील एक प्रसिद्ध नर्तिका ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील प्राजक्ता माळीचे आरसपाणी सौंदर्य आणि गश्मीर महाजनीचा प्रकांडपंडीत यांचा लूक पाहण्यासारखा आहे. देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरली आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला की हे हिट हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

चित्रपटाची पाच दिवसांची कमाई

सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘फुलवंती’ चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी फक्त ८ लाख रुपये कमावलेत. तर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी या चित्रपटाने ३६ लाख रुपये कमावले तर रविवारी ७५ लाख रुपयांचा पल्ला गाठला. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली. चौथ्या दिवशी केवळ १६ लाख रुपयांची कमाई सिनेमाने केली. पाचव्या दिवशी १९ लाख रुपयांचा गल्ला जमावला. आता पर्यंत चित्रपटाने केवळ १.५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाला फारसा नफा झालेला दिसत नाही.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते

कोणते कलाकार दिसले

‘फुलवंती’ चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी दिसत आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

Whats_app_banner