मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Google Aai Teaser: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर

Google Aai Teaser: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 29, 2024 11:48 AM IST

Google Aai Teaser: 'गूगल आई' टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दाखवण्यात आले आहे. एकंदरीत 'गूगल आई' या चित्रपटाचा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे.

Google Aai Teaser: 'गूगल आई' चित्रपटाचा टीझर
Google Aai Teaser: 'गूगल आई' चित्रपटाचा टीझर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील करत आहेत. तसेच चित्रपटात दाखवण्यात येणारी कथा ही काही तरी वेगळपण घेऊन येत असते. अशातच एका आगळ्यावेगळ्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे नाव 'गूगल आई' आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय आहे टीझर?

'गूगल आई' टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून 'गूगल आई' या कुटुंबाला कसे बाहेर काढते हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
वाचा: लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?

ट्रेंडिंग न्यूज

कोणते कलाकार दिसणार?

'गूगल आई' या चित्रपटात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट आहे. 'गूगल आई' या चित्रपटाची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा, लेखनाची धुरा सांभाळली आहे.
वाचा: 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन

अभिनेत्रीने शेअर केला टीझर

'गूगल आई' या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत तिने 'अनेक चेहऱ्यांमगे लपलेल्या रहस्याचा शोध घेणारा 'गूगल आई' चित्रपटाचा हा उत्कंठावर्धक टीझर!' असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

चित्रपटाबद्दल दिग्दर्शकाने व्यक्त केली उत्सुकता

'गूगल आई' या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, "एका लहान मुलीची ही कथा आहे जी संकटात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला 'गूगल आई' कसे बाहेर काढते. आता हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहाणे, औत्सुक्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."

WhatsApp channel
विभाग