तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणारी आई, 'गूगल आई' अनोख्या सिनेमाची घोषणा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणारी आई, 'गूगल आई' अनोख्या सिनेमाची घोषणा

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणारी आई, 'गूगल आई' अनोख्या सिनेमाची घोषणा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 23, 2024 10:55 AM IST

'गूगल आई' या चित्रपटाच्या नावावरुनच सिनेमामध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

Prajakta Gaikwad: 'गूगल आई' चित्रपटाचे पोस्टर
Prajakta Gaikwad: 'गूगल आई' चित्रपटाचे पोस्टर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील करत आहेत. तसेच चित्रपटात दाखवण्यात येणारी कथा ही काही तरी वेगळपण घेऊन येत असते. अशातच एका आगळ्यावेगळ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव 'गूगल आई' आहे. एकंदरीत चित्रपटाचे नाव पाहाता नेमकी काय कथा असणार याचा अनुमान प्रेक्षक लावत आहेत.

काय आहे चित्रपटाचे पोस्टर?

'गूगल आई' या नव्या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून पोस्टर देखील लाँच करण्यात आले आहे. पोस्टरवर आई, मुलगी आणि बाप दिसत आहे. तसेच खाली गुगल सर्च इंजीन दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटात सापडलेल्या आपल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या एका लहान मुलीची ही गोष्ट. एकंदरीत चित्रपटात एक अनोखा विषय मांडण्यात येणार असल्याचे दिसत आहे.
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

अभिनेत्रीने शेअर केले पोस्टर

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'गूगल आई' या तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या मोशन पोस्टरमध्ये चित्रपटात एका जोडप्याची कथा दाखवण्यात येणार असल्याचे दिसत आहे. तसेच त्या जोडप्याचा मुलीला सोडवण्यासाठी राजकारण्यांशी होणारा वाद दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. तसे या सगळ्यासाठी आई गुगल या तंत्रज्ञानाचा वापर कसा करते हे देखील दाखवण्यात येणार आहे.

कोणते कलाकार दिसणार?

'गूगल आई' या चित्रपटात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'गूगल आई' या चित्रपटाची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा, लेखनाची धुरा सांभाळली आहे.
वाचा: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

दिग्दर्शकाने सांगितले चित्रपटाविषयी

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, “निरागसता, तंत्रज्ञानाविषयी लहान मुलीचे असणारे ज्ञान, समजूतदारपणा, संकटांशी झुंज असा रोमांचक आणि मनोरंजनात्मक असा हा प्रवास आहे. मुळात चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, याचा अंदाज आला असेलच. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे, हे पाहाणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.”
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

Whats_app_banner