मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘रानबाजार’मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ता माळीच्या आईने दिली प्रतिक्रिया
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी (HT)

‘रानबाजार’मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ता माळीच्या आईने दिली प्रतिक्रिया

19 May 2022, 16:19 ISTAarti Vilas Borade

रानबाजार या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत या दोन्ही अभिनेत्रींनी बोल्ड सीन्स दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून 'रानबाजार' ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत एकदम वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन्स सध्या चर्चेत आहेत. त्यानंतर आता ट्रेलर पाहिल्यावर प्राजक्ताच्या आईची प्रतिक्रिया कशी होती हे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्राजक्ता माळीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला सीरिजबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी तिने तिच्या आईची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितले आहे. 'प्रेक्षकांची अशी प्रतिक्रिया येणार हे मला माहिती होते. कारण महाराष्ट्रामध्ये माझी एक वेगळी अशी ओळख आहे. हा प्रोजेक्ट जेव्हा मी साइन केला तेव्हा खूप विचार केला. प्रेक्षकांना तो आवडणार नाही याची कल्पना मला होती' असे प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणाली, 'सुरुवातीला या सीरिजमध्ये मी काम करते आहे हे लोकांना माहिती नव्हते पण आता ते स्पष्ट झाले की मी कामाठीपूरामधील सेक्स वर्करची भूमिका साकारते. टीझर हा सीरिज पेक्षा थोडा वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही सीरिज बघा. पहिला एपिसोड पाहूनच तुम्ही टाळ्या वाजवाल. या सीरिजमध्ये काम करायचं हे मी ठरवले होते म ती कोणतीही भूमिका असो.'

या मुलाखतीमध्ये प्राजक्ताला तिच्या आईची प्रतिक्रिया कशी होते हे पुढे विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्ता म्हणाली, 'माझी आई ही माझ्या पेक्षा जास्त बोल्ड आहे. ती नेहमी माझ्या १० पावले पुढे असते. मी पहिले तिची परवानगी घेतली आणि मग वेब सीरिजला होकार दिला. ती नेहमी माझी एक कलाकार आणि माणूस अशी वेगवेगळी विभागणी करत असते. एक अभिनेत्री म्हणून तिने मला यासाठी पाठिंबा दिला. मी आईला स्क्रिप्ट ऐकल्यानंतर भूमिकेविषयी सांगितले होते. तिने मला त्यावर जर आलिया गंगूबाई काठियावाडी चित्रपटात काम करु शकते तर तू नाही? असे म्हटले.'