एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत बानीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई. 'लाइफ पार्टनर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'सह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारी प्राची सध्या चित्रपटसृष्टीमध्ये फारशी सक्रिय दिसत नाही. तिच्या अभिनयासोबतच तिचा साधेपणा कायम सर्वांची मने जिंकत आला आहे. आज १२ सप्टेंबर रोजी प्राचीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
प्राची देसाई तिच्या चित्रपटांमुळे जितकी चर्चेत राहिली, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रसिद्धी झोतात राहिली आहे. तिने एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला होता. अभिनेत्री प्राची देसाई एकेकाळी खास व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र, याच व्यक्तीने प्राचीला आयुष्यात सगळ्यात मोठा धक्का दिला होता. प्राची देसाई एकदा तिच्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी थेट परदेशात पोहोचली होती. डेटिंग दरम्यान प्राची या खास व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र, परदेशात गेल्यावर प्राचीला सगळ्यात मोठा धक्का बसला होता.
या व्यक्तीशी बोलत असताना त्याने आपण ज्या देशात राहत आहोत त्याचे नाव सांगितले होते. या नंतर त्याला भेटण्यासाठी प्राची देसाई थेट त्या देशात पोहोचली होती. मात्र, तिथे गेल्यावर तिला कळलं की, तो व्यक्ती तिच्याशी खोटं बोलत होता. त्याने सांगितलेला पत्ता देखील खोटा होता. हे सगळं कळल्यावर प्राची देसाई कोलमडून गेली होती. मात्र, त्यावेळी पुन्हा भारतात न परतता, तिने त्याच देशांत राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला सावरले.
'मी पहिल्यांदा कोणासाठी तरी एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास केला होता. जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा तो मुलगा त्याच देशात होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला भेटण्यासाठी गेली… तेव्हा तो तिकडे नव्हता… तेव्हा तो माझ्यासोबत खोटे बोलला होता. तिथे मी रडत न बसला एकटीने ट्रीपचा आनंद घेतला. स्वतःला वेळ दिला..’ असे प्राची म्हणाली होती.
वाचा: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू
या दरम्यानच्या काळात प्राची देसाईचे नाव दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत देखील जोडले गेले होते. रोहित शेट्टीच्या ‘बोल बच्चन’ या चित्रपटात प्राची देसाई झळकली होती. याच चित्रपटादरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघेही एकत्र राहायचे, असे देखील अनेक मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. मात्र, नंतर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले.