Salaar Box Office Collection: प्रभासने करून दाखवलं! 'सालार'नं ७ दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salaar Box Office Collection: प्रभासने करून दाखवलं! 'सालार'नं ७ दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा

Salaar Box Office Collection: प्रभासने करून दाखवलं! 'सालार'नं ७ दिवसांत पार केला ३०० कोटींचा टप्पा

Dec 29, 2023 01:41 PM IST

Salaar Box Office Collection Day 7: प्रभासचा हा क्राईम थ्रिलर चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. 'सालार'ने रिलीजच्या सातव्या दिवशी देखील कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

Salaar Box Office Collection Day 7
Salaar Box Office Collection Day 7

Salaar Box Office Collection Day 7: 'बाहुबली' स्टार प्रभासचा 'सालार: पार्ट १ सीझफायर' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून तगडी कमाई करत आहे. इतकंच नाही तर, हा चित्रपट दररोज नवीन विक्रमही करत आहे. प्रभासचा हा क्राईम थ्रिलर चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. 'सालार'ने रिलीजच्या सातव्या दिवशी देखील कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

'सालार' २२ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करून कल्ला केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग घेणारा चित्रपट ठरला आहे. 'सालार'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ६२.०५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ४६.३० कोटी रुपये, पाचव्या दिवशी २४.९० कोटी आणि सहाव्या दिवशी १५.१० कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

सॅकनिल्कच्या ट्रेंडच्या रिपोर्टनुसार, 'सालार' ने रिलीजच्या सातव्या दिवशी १३.५० कोटी रुपये कमवले आहेत. यासह 'सालार'चे एकूण ७ दिवसांचे कलेक्शन आता ३०८.९० कोटी रुपये झाले आहे. 'सालार' देशातच नव्हे तर जगभरात प्रचंड नफा कमवत आहे. या चित्रपटाला जागतिक बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'सालार'ने रिलीजच्या ६ दिवसांत ४५०.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनमध्ये २० ते ३० कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थात ७व्या दिवशीच्या कलेक्शननंतर हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner