Salaar Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा प्रभासची जादू दिसली आहे. चाहत्यांना प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले आहे. 'सालार'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे . चित्रपटातील धमाकेदार अॅक्शन सीन्स आणि स्टारकास्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त कलेक्शन केल्यानंतर 'सालार पार्ट-१ सीझफायर'ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. 'सालार'ने दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'सालार' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाषांमध्ये जवळपास ५७.६१ कोटींची कमाई केली आहे. सध्या ही आकडेवारी प्राथमिक आणि अंदाजे आहे. अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर थोडे बदल होऊ शकतात. यासह चित्रपटाची एकूण कमाई १४८.३१ कोटी रुपये होईल. 'सालार' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. प्रभास स्टारर 'सालार' हा चित्रपट नेमका त्याच अपेक्षांवर पुढे सरकताना दिसत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सालार'ने कमाईत मोठी झेप घेतली आहे.
'सालार'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे, त्यावरून हा सिनेमा ओपनिंग वीकेंडला बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांची कमाई सहज करेल हे स्पष्ट दिसत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासाठी 'सालार' हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे. याआधी त्यांनी रॉकिंग स्टार यशसोबत 'केजीएफ चॅप्टर १' आणि 'केजीएफ चॅप्टर २'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. या सोनंही चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत धडाका लावला होता. आता त्यांच्या याच सुपरहिट चित्रपटांच्या यादीत 'सालार'चाही समावेश होणार आहे.
संबंधित बातम्या