मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prabhas: काळं शर्ट, लुंगी अन् फ्लिप फ्लॉप; प्रभासच्या ‘राजा साब’ लूकची सोशल मीडियावर चर्चा!

Prabhas: काळं शर्ट, लुंगी अन् फ्लिप फ्लॉप; प्रभासच्या ‘राजा साब’ लूकची सोशल मीडियावर चर्चा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 15, 2024 08:06 AM IST

Prabhas Raja Saab Look: ‘डार्लिंग’ स्टार प्रभासने मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच आगामी चित्रपट 'राजा साब'चा फर्स्ट लूक लाँच केला.

Prabhas Raja Saab Look
Prabhas Raja Saab Look

Prabhas Raja Saab Look: बॉलिवूडचा ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास याने त्याच्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी एक खास आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने चाहत्यांना गुड मॉर्निंग म्हणत आपल्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यासोबतच त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे नाव देखील जाहीर केले आहे. मात्र, सध्या त्याच्या या चित्रपटातील लूकने सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला आहे. ‘राजा साब’ असे प्रभासच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्याचा लूक अगदीच हटके असणार आहे.

‘डार्लिंग’ स्टार प्रभासने मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच आगामी चित्रपट 'राजा साब'चा फर्स्ट लूक लाँच केला. एक पोस्टर शेअर करत त्याने आपल्या लूकची झलक देखील दाखवली आहे. प्रभासच्या या चित्रपटातील लूक प्रेक्षकांना चांगलाच साऊथचा जलवा दाखवणारा आहे. प्रभासच्या या आगामी चित्रपटात एक अतिशय सध्या माणसाची कथा दाखवण्यात येणार असावी, असे या फर्स्ट लूकवरून वाटत आहे. प्रभासच्या या लूकबद्दल बोलायचे तर, यात पूर्ण साऊथ फील आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास लुंगी स्टाईलमध्ये उचलून आपला जलवा दाखवताना दिसत आहे.

Neil Nitin Mukesh Birthday: चित्रपटात ३० किसिंग अन् एक न्यूड सीन; नील नितीन मुकेशने बॉलिवूडमध्ये माजवलेली खळबळ!

प्रभासने शेअर केलेल्या या पोस्टरच्या पार्श्वभूमीत रस्ता आणि भरपूर फटाके दिसत आहेत. यातूनच वाट काढत तो पुढे सरकत आहे. यादरम्यान त्याने अगदी स्टाईलमध्ये आपली लुंगी उचलून धरली आहे. प्रभासचा हा राउडी साऊथ लूक पाहून तो एखाद्या स्ट्रीट किंग टाईपची भूमिका करतोय असा कयास आता बांधला जात आहे. मात्र, काळा शर्ट, लुंगी आणि फ्लिप फ्लॉप असा हा त्याचा लूक सोशल मीडियावर कल्ला करत आहे.

अभिनेता प्रभासची पोस्ट शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नव्या चित्रपटामुळे प्रभासच्या चाहत्यावर्गामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. प्रभासच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच दिवसांनंतर प्रभासला या स्टाईलमध्ये पाहून त्याचे चाहतेही खूप खूश झाले आहेत.

WhatsApp channel

विभाग