मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salaar Box Office Collection: प्रभासची जादू ओसरली! 'सलार'ची कमाई कमी झाली

Salaar Box Office Collection: प्रभासची जादू ओसरली! 'सलार'ची कमाई कमी झाली

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 02, 2024 01:12 PM IST

Salaar Box Office Collection Day 11: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सलार' या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'डंकी'ला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.

Salaar Box Office Collection Day 11
Salaar Box Office Collection Day 11

सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची हवा पाहयला मिळते. प्रेक्षक आवडीने त्यांचे चित्रपट पाहाताना दिसतात. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या 'सलार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई कमाई केली. आता या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळते.

'सलार' चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने आता पर्यंत ६२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. १ जानेवारी रोजी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चित्रपटाने केवळ १५.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ३६०.७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. १ जानेवारीला चित्रपटाच्या कमाईत ४८ टक्के घट झाली आहे.
वाचा: 'या' टीव्ही शोने बदलले विद्या बालनचे पूर्ण आयुष्य, जाणून घ्या कसा मिळाला पहिला सिनेमा

सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ९०.७ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६२.०५ कोटी, चौथ्या दिवशी ४६.३ कोटी, पाचव्या दिवशी २४.९ कोटी, सहाव्या दिवशी १५.६ कोटी, सातव्या दिवशी १२.१ कोटी, आठव्या दिवशी ९.६२ कोटी, नवव्या दिवशी १२.५५ कोटी आणि दहाव्या दिवशी १४.५० कोटींची कमाई आणि अकराव्या दिवशी १५ कोटी रुपये गमावले आहेत. चित्रपटाने ३६० कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रशांत नील दिग्दर्शित 'सलार' हा चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एक दिवस उशिरा प्रदर्शित झाला. तरी देखील कमाईच्या बाबतीत सलार वरचढ असल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासाठी 'सलार' हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे. याआधी त्यांनी रॉकिंग स्टार यशसोबत 'केजीएफ चॅप्टर १' आणि 'केजीएफ चॅप्टर २'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. या दोनंही चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत धडाका लावला होता. आता त्यांच्या याच सुपरहिट चित्रपटांच्या यादीत 'सालार'चाही समावेश होणार आहे. 'सलार' या चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू, बॉबी सिम्हा, टीनू आनंद आणि रामचंद्र राजू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

WhatsApp channel