मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salaar Box Office Collection: प्रभासची हवा!'सलार'ने १० दिवसांत पार केला ५०० कोटींचा पल्ला

Salaar Box Office Collection: प्रभासची हवा!'सलार'ने १० दिवसांत पार केला ५०० कोटींचा पल्ला

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 01, 2024 10:35 AM IST

Salaar Box Office Collection Day 10: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सलार' या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'डंकी'ला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

Salaar
Salaar

सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची हवा पाहयला मिळते. प्रेक्षक आवडीने त्यांचे चित्रपट पाहाताना दिसतात. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या 'सलार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करताना दिसत असून प्रभासच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. आता प्रदर्शनाच्या दहा दिवसात चित्रपटाने किती कमाई केली आहे हे जाणून घ्या...

सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ९०.७ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ६२.०५ कोटी, चौथ्या दिवशी ४६.३ कोटी, पाचव्या दिवशी २४.९ कोटी, सहाव्या दिवशी १५.६ कोटी, सातव्या दिवशी १२.१ कोटी, आठव्या दिवशी ९.६२ कोटी, नवव्या दिवशी १२.५५ कोटी आणि दहाव्या दिवशी १४.५० कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या १० दिवसांत या सिनेमाने ३४४.६७ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने ५०४.६ कोटींचा गल्ला जमवला आहे.
वाचा: मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील खास फोटो पाहिलेत का? पहिला फोटो आला समोर

पहिला दिवस : ९०.७ कोटी

दुसरा दिवस : ५६.३५ कोटी

तिसरा दिवस : ६२.०५ कोटी

चौथा दिवस : ४६.३ कोटी

पाचवा दिवस : २४.९ कोटी

सहावा दिवस : १५.६ कोटी

सातवा दिवस : १२.१ कोटी

आठवा दिवस : ९.६२ कोटी

नववा दिवस : १२.५५ कोटी

दहावा दिवस : १४.५० कोटी

एकूण कमाई : ३४४.६७ कोटी

प्रशांत नील दिग्दर्शित 'सलार' हा चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या एक दिवस उशिरा प्रदर्शित झाला. तरी देखील कमाईच्या बाबतीत सलार वरचढ असल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासाठी 'सलार' हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे. याआधी त्यांनी रॉकिंग स्टार यशसोबत 'केजीएफ चॅप्टर १' आणि 'केजीएफ चॅप्टर २'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. या दोनंही चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत धडाका लावला होता. आता त्यांच्या याच सुपरहिट चित्रपटांच्या यादीत 'सालार'चाही समावेश होणार आहे. 'सलार' या चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू, बॉबी सिम्हा, टीनू आनंद आणि रामचंद्र राजू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

WhatsApp channel