प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये

प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 01, 2024 08:31 AM IST

Kalki 2898 AD Day 4 Box Office Collection: 'कल्की 2898' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या चार दिवसांच्या कमाईचे आकडे पाहूयात.

Kalki 2898 AD
Kalki 2898 AD

प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने चार दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. इतकंच नाही तर नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर ही भरपूर कमाई करत आहे. चला पाहूया चित्रपटाची कमाई...

२०२४ वर्षात सर्वाधिक कमाई करणारे सिनेमा

सॅनिल्कच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत हृतिक रोशनचा 'फायटर' हा चित्रपट २०२४ सालातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. पण आता 'कल्की 2898 एडी' हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'फायटर' या चित्रपटाने २१२.७९ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता 'कल्की 2898 एडी'ने चार दिवसांत ३०२.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट ठरला आहे.
वाचा: 'जुनं फर्निचर' सिनेमा घरबसल्या पाहायचाय? मग ही बातमी नक्की वाचा

'कल्की 2898'चे चार दिवसांचे कलेक्शन

दिवस एक [गुरुवार] - ९५.३ कोटी रुपये

दिवस दुसरा [शुक्रवार] - ५७.६ कोटी रुपये

दिवस तिसरा [शनिवार] - ६४.५ कोटी रुपये

दिवस चौथा [रविवार] - ८५.०० कोटी रुपये

एकूण - ३०२.४ कोटी रुपये

प्रभासच्या चित्रपटाने केवळ तेलुगूमध्येच नव्हे तर हिंदीतही चांगली कमाई केली आहे. चार दिवसांत हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी २२.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २३ कोटी, तिसऱ्या दिवशी २६ कोटी, तर चौथ्या दिवशी चित्रपटाने ३९ कोटींची कमाई केली. एकूण ११०.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी 'गूगल आई', पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर

'कल्की 2898 इ.स.' हिंदी बॉक्स ऑफिस

दिवस १ [गुरुवार] - २२.५ कोटी रुपये

दिवस २ [शुक्रवार] - २३ कोटी रुपये

दिवस ३ [शनिवार] - २६ कोटी रुपये

दिवस ४ [रविवार] - ३९ कोटी रुपये

कलाकारांच्या भूमिका

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. तर प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोणने सुमथीची भूमिका साकारली आहे. सुमथीच्या पोटी कल्कीचा जन्म होणार असतो. भैरव हा सुमथीची गरोदरपणात काळजी घेत असतो.

Whats_app_banner