मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नयनतारानंतर आता प्रभासही अडकणार लग्नबंधनात, कुटुंबियांनी सुरु केली लग्नाची तयारी

नयनतारानंतर आता प्रभासही अडकणार लग्नबंधनात, कुटुंबियांनी सुरु केली लग्नाची तयारी

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 15, 2022 12:09 PM IST

नयनतारा नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'बाहुबली' म्हणजेच अभिनेता प्रभास याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये.

प्रभास
प्रभास

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिने नुकतीच दिग्दर्शक विग्नेश शिवन सोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले. नयनतारा नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'बाहुबली' म्हणजेच अभिनेता प्रभास (prabhas) याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. कारण प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रभास लव्ह मॅरिज नाही तर घरातल्यांनी ठरवून दिलेल्या मुलीसोबत विवाह करणार आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यासाठी मुलगी देखील शोधली आहे.

९ तारखेला नयनतारा लग्नबंधनात अडकली त्यानंतर चाहते प्रभासच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभासही याच वर्षी लग्न करणार आहे. गेल्या वर्षभरात अनेक बॉलिवूड कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आता चाहत्यांना प्रभासचं लग्न पाहायची आतुरता आहे. प्रभास आता ४२ वर्षाचा असून त्याच्या घरातल्यांनी त्याच्यासाठी मुलगी देखील पाहिली आहे. इतकंच नाही तर त्याच्या लग्नाची तयारी देखील सुरु झाली आहे. ही माहिती स्वतः प्रभासच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांची जोडी चाहत्यांची आवडती होती. त्यांच्यामध्ये प्रेम असल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर होत्या. मात्र त्या दोघांनीही या नात्याला कधीही मान्यता दिली नाही. आपण चांगले मित्र असल्याचं त्यांनी म्हटलं. आताही अनुष्का आणि प्रभास दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदात आहेत. आता अनुष्का आणि प्रभास यांच्यात कोणतंही नातं नसल्याचं कळताच प्रभास नक्की कोणसोबत लग्न करतोय याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

IPL_Entry_Point

विभाग