या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट 'कल्की 2898 एडी' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटातील अभिनय, व्हीएफएक्स प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र चित्रपटाची पटकथा थोडी कमकुवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. मात्र, पहिल्या दिवसानुसार दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने थोडी कमी कमाई केल्याचे समोर आले आहे.
Sacnilk.com रिपोर्टनुसार, 'कल्की 2898 एडी'ने दुसऱ्या दिवशी भारतात ५४ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने तेलुगू भाषेत २५.६५ कोटी, तमिळमध्ये ३.५ कोटी, हिंदीमध्ये २२.५ कोटी, कन्नडमध्ये ०.३५ कोटी आणि मल्याळममध्ये जवळपास २ कोटींची कमाई केली आहे.
वाचा : मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ९५.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४३.३४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. प्रभास, अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी १४९.३ कोटींची कमाई केली आहे.
वाचा : 'प्रेमासाठी लढणार', ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन
'कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे बजेट हे ६०० कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे हिंदीमधील व्हर्जन ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर येणार आहे. पण चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे हक्क जवळपास १७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. स्टार्सच्या फीबद्दल बोलायचे झाले तर प्रभास आणि कमल हासन यांना या चित्रपटासाठी १००-१०० कोटी रुपये मिळाले आहेत. तर अमिताभ बच्चन यांना या चित्रपटासाठी ३५ ते ४० कोटी रुपये मिळाले आहेत. या चित्रपटासाठी दीपिकाची फी २० कोटी रुपये आहे. दिशा पटानीबद्दल बोलायचे झाले तर तिला या चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मिळाले आहेत.
वाचा : लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानी यांची खास तयारी, खरेदी केलेल्या नव्या साडीची किंमत माहिती आहे का?
संबंधित बातम्या