मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Republic day 2023: 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष भाग

Republic day 2023: 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष भाग

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 25, 2023 05:30 PM IST

'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी विशेष शुभेच्छा पत्रे लिहिण्यात आली आहेत.

पोस्ट ऑफिस उघडं आहे
पोस्ट ऑफिस उघडं आहे (HT)

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भारतीय राज्यघटना लागू झाली. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच परिसर आणि सोसायटीमध्ये उत्सव साजरा केला जातो. आता सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी पत्र लिहिण्यात आली आहेत.

सोनी मराठी वाहिनीवरील 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष भाग असणार आहे. या भागात सैन्यदलाला शुभेच्छा देण्यासाठी खास पत्र लिहिण्यात आले आहे.
वाचा: अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला'चा टीझर पाहिलात का?

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधील ही गोष्ट आहे. या मालिकेतल्या कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अश्या काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पोस्ट मास्टर कुलकर्णी यांना प्रतीक्षा आहे त्यांच्या बदलीची तसेच निरगुडकरांना चिंता आहे रंजना काय म्हणेल याची.

मालिकेत आता २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील मुलांनी भारतीय सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. ती शुभेच्छा पत्रे एवढी सुंदर लिहिली आहेत की, पोस्टातील कर्मचारी ती पत्रे सैन्यदलापर्यंत स्वखर्चानी पोचवणार आहेत. मुलांच्या भावना व देशावरचे प्रेम त्या पत्रांतून व्यक्त झाले आहे. पोस्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने ती पत्रे सैन्यदलापर्यंत पोहोचवली आहेत.

IPL_Entry_Point

विभाग