मॅजिस्ट्रेटच्या इच्छेसाठी श्रीदेवीला जबरदस्ती कोर्टात बोलावलं गेलं; प्रसिद्ध वकिलाचा धक्कादायक खुलासा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मॅजिस्ट्रेटच्या इच्छेसाठी श्रीदेवीला जबरदस्ती कोर्टात बोलावलं गेलं; प्रसिद्ध वकिलाचा धक्कादायक खुलासा

मॅजिस्ट्रेटच्या इच्छेसाठी श्रीदेवीला जबरदस्ती कोर्टात बोलावलं गेलं; प्रसिद्ध वकिलाचा धक्कादायक खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2025 07:04 PM IST

श्रीदेवी ही बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री होती. एकेकाळी तिची एक झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी होत असे. नुकताच एका वकिलांनी एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. चला जाणून घेऊया...

Sridevi
Sridevi

ज्येष्ठ वकील मजीद मेमन यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. दरम्यान, त्यांनी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचा देखील किस्सा सांगितला आहे. एका प्रकरणात मॅजिस्ट्रेटला श्रीदेवीला भेटायचे असल्याने जबरदस्तीने कोर्टात बोलावले होते. सलमान आणि शाहरूखशी संबंधित प्रकरणावरही मजीद मेमन यांनी वक्तव्य केले.

सविस्तर माहिती देण्यास दिला नकार

एकेकाळी श्रीदेवीची बॉलिवूडमध्ये तुफान क्रेझ होती. तिचा प्रत्येक सिनेमा हा सुपरहिट ठरत होता. त्यामुळे श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी होत असे. इंडियन एक्सप्रेस स्क्रीनशी बोलताना माजिद मेमन यांनी या पुस्तकात न लिहिलेल्या एका प्रकरणाचा उल्लेख केला. हे प्रकरण दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित होते. ते म्हणाले की नेमकं काय झालं होतं हे ते सांगू नाही शकत, पण दंडाधिकाऱ्यांनी श्रीदेवीला फक्त पाहायचे आहे म्हणून समन्स बजावले होते.
वाचा: देवोलीना भट्टाचार्जीने केलं मुलाचं बारसं, हिंदू किंवा मुस्लीम नाव न ठेवता केली 'या' नावाची निवड

श्रीदेवीमुळे कोर्टात झाली होती तुफान गर्दी

मजीद मेमन यांनी म्हटले की, 'मी एकेकाळी श्रीदेवीच्या केसमध्ये लक्ष घालत होतो. त्यावेळी ती इंडस्ट्रीत टॉपवर होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे झाले होते, मॅजिस्ट्रेटही तिला पाहण्यासाठी उत्सुक होते. मी सवलतीसाठी अर्ज केला पण तो आम्हाला देण्यात आला नाही. मॅजिस्ट्रेट म्हणाले की, माझ्या क्लायंटला, श्रीदेवीला भेटायचे होते म्हणून यावे लागले. अखेर ती कोर्टात पोहोचली तेव्हा गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. या प्रकरणाला ग्लॅमर जोडण्यासाठी शाहरुख खान आणि सलमान खान यांची नावे भरत शाहच्या प्रकरणात जबरदस्तीने ओढण्यात आल्याचा खुलासाही मजीदने केला.

Whats_app_banner