Poonam Pandey: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे ही चर्चेत आहे. तिने केलेल्या स्टंटने सर्वांचे लक्ष वेधले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने पूनमचे निधन झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पूनमने एक व्हिडीओ शेअर करत जीवंत असल्याची माहिती दिली. या सर्व प्रकरणानंतर पूनमचं काहींनी कौतुक केले तर काहींनी तिला ट्रोल केले. आता पूनम पांडेला केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी पूनमची टीम आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करत आहे.
पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार,गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगामुळे निधन झाल्याची अफवा पसरवणारी पूनम पांडे हिची नियुक्ती सरकारच्या कर्करोगच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर होण्याची शक्यता आहे. पूनमची टीम आणि आरोग्य मंत्रालय यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे.
वाचा: 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण होणार? 'हे' आहेत टॉप ५ स्पर्धक
काही दिवसांपूर्वी पूनमच्या टीमने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने पूनमचे निधन झाल्याचे सांगत खळबळ माजवली होती. त्यानंतर पूनमने जीवंत असल्याचे व्हिडीओ शेअर करत सांगितले. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. कर्करोगाशी संबंधीत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले असे सांगत पूनमने काहींची मने जिंकली. पण काहींनी तिला चांगलेच सुनावले.
त्यानंतर पूनमने २०१३मध्ये 'नशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूनम ही विशेष करुन तिच्या न्यूड आणि बोल्ड फोटोंसाठी ओळखली जायची. तिने कंगना रणौतच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये देखील वादग्रस्त विधान आणि अश्लील वागण्यामुळे ती चर्चेत होती.
पूनम पांडे ही अतिशय लोकप्रिय मॉडेल होती. २०११मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप फायनलच्या वेळी पूनम पांडे खरी चर्चेत आली. यावेळी तिने व्हिडीओ शेअर करत 'जर भारत वर्ल्ड कप जिंकला तर सर्वांसमोर कपडे काढेन' असे म्हटल्यामुळे रंगल्या होत्या. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले होते.
संबंधित बातम्या