Poonam Pandey Viral Video: सध्या मनोरंजन विश्वात अन् सोशल मीडियावर केवळ पूनम पांडे हिच्या नावाचीच चर्चा आहे. आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे वृत्त आता सगळीकडेच पसरले आहे. तिच्या काही चाहत्यांना मात्र यावर विश्वास ठेवावा वाटत नाही. तर, काहींना ह ऐकून धक्का बसला आहे. पूनम पांडेचे वयाच्या ३२व्या वर्षी निधन झाले आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अर्थात सर्व्हायकल कॅन्सरमुळे पूनम पांडे हिचा मृत्यू झाल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगण्यात आले आहे. दरम्यान तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक तो पुन्हा पुन्हा बघत आहेत.
अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. राहुल वैद्य, विनीत कक्कर आणि अभिनेत्रीचा कथित प्रियकर बिपिन हेडेकर यांनीही पूनम पांडेच्या मृत्यूला निव्वळ अफवा म्हटले आहे. सोशल मीडियावरही लोकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. या सगळ्या दरम्यान पूनम पांडेचा एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजूनही ‘#PoonamPandeyDeath’ ट्रेंड करत आहे. मात्र, या सगळ्या दरम्यान अभिनेत्री पूनम पांडे हिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असेलला हा व्हिडीओ स्वत: पूनम पांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर गेल्या महिन्यात शेअर केला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये बिकिन घालून चिल करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये पूनम पांडे हिने बिकिनी घातली असून, आपल्या हॉटनेस आणि सौंदर्याच्या जादूने तिने अक्षरशः पाण्यातही आग लावली आहे. हॉट व्हिडीओ पोस्ट करताना पूनमने कॅप्शन दिले की, 'मी पोहते तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो.' अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनीही हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. तर, पूनमच्या निधनाच्या वृत्तानंतर चाहते विश्वास बसत नसल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
दुसरीकडे पूनम पांडेच्या मृत्यूचे गूढ आता अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. पूनम पांडे हिच्या मृत्यूची बातमी समोर आली, पण मृतदेहाचा पत्ता नाही. अभिनेत्रीचे कुटुंबीयही या प्रकरणी कोणतेही उत्तर देत नाहीये. सर्वांचे फोन बंद आहेत. दरम्यान, पूनम पांडेचा कथित एक्स बॉयफ्रेंड बिपिन हेडेकर याने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच, पूनमला काहीही झाले नसल्याचा दावा त्याने केला आहे.
संबंधित बातम्या