- पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून पूनम पांडे (Poonam Pandey) ओळखली जाते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती लॉक अप या शोमध्ये दिसली होती. तेव्हा देखील ती चर्चेत होती. आता पूनमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील ब्रालेस लूकमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूनम पांडेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मुंबईतील रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाची ट्राउजर घातली आहे. पण पूनमने ब्रा न घातल्याने तिला ट्रोल केले जात आहे.
सध्या सोशल मीडियावर पूनमचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील लूक मुळे तिला ट्रोल केले जात आहे. एका यूजरने पूनमला 'ब्रा तरी घाल' असा सल्ला दिला आहे. त्यानंतर दुसऱ्या एका यूजरने 'अंतर्वस्त्र घालायला विसरली का' असा प्रश्न विचारला आहे. तर तिसऱ्या एका यूजरने 'अंतर्वस्त्रांचा खर्चच नाही' असे म्हटले आहे. पण पूनम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपण पाहिले आहे.