Poonam Pandey Death News: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे यांच्या निधनाची बातमी शुक्रवारी सकाळी समोर आली आणि संपूर्ण मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला. अभिनेत्री पूनम पांडे हिने निधन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग अर्थात सर्व्हायकल कॅन्सरमुळे वयाच्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. पण, आता अभिनेत्रीच्या मृत्यूशी संबंधित धक्कादायक अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल हे ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नुकताच एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्रीचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे नाही, तर ड्रगच्या ओव्हरडोजमुळे झाला आहे.
पूनम पांडेच्या एका जवळच्या व्यक्तीने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटले की, रिपोर्टनुसार पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने नव्हे, तर ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे झाला आहे. मात्र, अभिनेत्रीने कोणत्या प्रकारची नशा केली होती, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. याआधी काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले होते की, अभिनेत्रीला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पूनम पांडेचे पार्थिव उत्तर प्रदेशात नेण्यात आले. मात्र, या बातम्यांवर पूनम पांडे हिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘झूम’च्या रिपोर्टनुसार, पूनम पांडेचा बॉडीगार्ड अमीन खान याच्याशी तिच्या मृत्यूबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क करण्यात आला. मात्र, यावेळी तो म्हणाला की, ‘सध्या मी यावर काहीही बोलू शकत नाही. कारण, मी स्वतः शॉकमध्ये आहे. पूनमच्या यूपीतील घराला कुलूप आहे. तिच्या निधनाची कोणतीही माहिती तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मला दिलेली नाही.’
अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे वृत्त आता जगभरात पसरले आहे. तिच्या टीमने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटमेंट जारी केले होते. यात म्हणले होते की, ’आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम हिचे निधन झाले आहे. तिच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्तीला तिने भरभरून प्रेम दिले. या दुःखद प्रसंगी तुम्ही आमच्या प्रायव्हसीची मान ठेवलं, अशी आशा आहे.’ सध्या पूनम पांडेच्या चाहत्यांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. अभिनेत्रीचा मृत्यू झाला तर, तिचे पार्थिव नक्की कुठे आहे, असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
संबंधित बातम्या