Pooja Sawant Engagement: मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून पूजा सावंतचे नाव घेतले जाते. पूजा सावंत कोणाला डेट करत आहे? ती लग्न कधी करणार असे प्रश्न चाहत्यांना पडत असताना पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुखद दिला होता. काही दिवसांपूर्वी तिने जोडीदारासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता पूजाने गपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
पूजा सावंतने उद्योगपती सिद्देश चव्हाणशी साखरपुडा केला आहे. एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा साखरपुडा ठेवला होता. या साखरपुड्याला जवळचे मित्र मंडळी आणि काही मोजक्याच कुटुंबियांना बोलावण्यात आले होते. पूजाने साखरपुड्याला आधी हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. त्यावर नाकात नथ, गळ्यात हार, सुंदर असता मेकअप, शोभून दिसणारी ज्वेलरी असा लूक केला होता. या लूकमध्ये पूजा अतिशय ग्लॅमरस दिसत होती. त्यानंतर तिने पांढऱ्या रंगाचा लेहंग घातला होता. तिचा पती सिद्धेशने देखील तिला मॅचिंक लूक केला होता. दोघेही एकदम क्यूट अंदाजात दिसत होते.
वाचा: शेतकरी नवरा हवा…; सायली संजीव हिच्या विधानावरून तर्कवितर्कांना उधाण
काही दिवसांपूर्वी पूजाने सोशल मीडियावर सिद्देशसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या फोटोंमध्ये सिद्देशचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे पूजा नेमकं कोणाशी लग्न करते हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते.
पूजा सावंतने जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा होणाऱ्या पतीचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. रिपोर्टनुसार, पूजा सावंतचा होणारा पती ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे.
पूजा सावंतने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण एबीपी माझाशी सोबताना पूजा म्हणाली होती की, "चव्हाण आणि सावंत हे दोन्ही कुटुंबिय मिळून लग्नाबाबत निर्णय घेतील. सध्या दोन्ही कुटुबियांमध्ये लग्नाबाबत बोलणी सुरू आहे. सिद्धेशला त्याच्या कामातून आणि मला माझ्या प्रोजेक्टमधून वेळ मिळेल त्यावेळी लगेचच आम्ही लग्न करू. उखाणे घेण्यास आता मी सज्ज आहे."
संबंधित बातम्या