Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांनी पोलिसात केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांनी पोलिसात केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ayesha Shroff: जॅकी श्रॉफची पत्नी आयशा यांनी पोलिसात केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jun 09, 2023 03:04 PM IST

Ayesha Shroff: आयेशा श्रॉफ यांच्या विरोधात लाखो रुपयांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.

Ayesha Shroff
Ayesha Shroff

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची ५८.५३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी तक्रारीमध्ये केला आहे. या प्रकरणी अॅलन फर्नांडिस यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात कलम ४०८, ४२०, ४६५, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अॅलन फर्नांडिसची एमएमए मट्रीक्स कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेषन म्हणून काम करत होता. एमएमए मट्रीक्स जीम हे टायगर श्रॉफचे असून तो चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने त्याची आई आयेशा ही तेथील सर्व कामकाज पाहत होती. अॅलनने कंपनीमध्ये मार्षल आर्टचे प्रशिक्षण देण्याकरीता ३ लाख रुपये वेतन देऊन माणसे कामाला ठेवली होती.

अॅलनने कंपनीच्या माध्यमातून भारतात आणि भारताबाहेर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत अनेकांनी ५८ लाख ५३ हजार रुपये एवढी फी दिली होती. अॅलने ही फी कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या खात्यात जमा केली. तसेच काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन कंपनीचा विश्वासघात करून फसवणुक केली. त्याच बरोबर एमएमए मट्रीक्स कंपनीचे बनावट लेटर हेड तयार करून त्यावर स्वाक्षरी करून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला म्हणून त्याचा विरुद्ध कायदेशीर करवाई करण्यात आली आहे.

Whats_app_banner