Police Arrest Urfi Javed: बॉलिवूडची फॅशनिस्टा उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस उर्फी जावेद हिला अटक करून पोलीस ठाण्यात नेताना दिसत आहेत. हे पाहून लोकांना प्रश्न पडला आहे, हे नेमकं काय प्रकरण आहे? मात्र, हा व्हिडीओ खरा आहे की, प्रँक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पापाराझींनी उर्फी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पोलीस रेस्टॉरंटमध्ये आलेल्या उर्फी जावेदला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी उर्फी काहीशी वैतागलेली दिसते. तिची पोलिसांशी बाचाबाची देखील होते. उर्फीने प्रश्न विचारताच, तेव्हा दोन महिला अधिकारी तिला सांगतात की, तिने लहान कपडे घातले आहेत आणि आता त्यासाठी तिला पोलिस स्टेशनला चलावेच लागेल.
यानंतर उर्फी जावेद सतत पोलीस ठाण्यात जाण्यास नकार देताना दिसत आहे. पण, दोन्ही महिला अधिकारी तिची विनंती मान्य करत नाहीत आणि अभिनेत्रीला गाडीत बसवून निघून जातात. मग, उर्फी म्हणते ही कशी वागणूक देताय मला? हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिचे चाहतेही चिंतेत पडले आहेत.
या व्हिडीओचे नेमकं सत्य काय आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, अचानक हे काय घडले याबद्दल युजर्सना प्रश्न पडले आहेत. हा व्हिडीओ खरा आहे की, प्रँक असा सवाल सर्व चाहते करत आहेत. बहुतेक लोकांनी याला प्रँक म्हटले आहे. एका यूजरने यावर कमेंट करून लिहिले की, 'ओव्हरअॅक्टिंगसाठी ५० रुपये काप यांचे..'. मात्र, उर्फी जावेदने अद्याप याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
संबंधित बातम्या