Diljit Dosanjh Meets PM Narendra Modi : पंजाबी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार दिलजीत दोसांझ याने नवीन वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गायकाने त्याच्या इंस्टाग्रामवर या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान असे म्हणताना दिसत आहेत की, जेव्हा भारतातील एका खेड्यातील मुलगा आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने देश आणि जगात नाव कमावतो, तेव्हा ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते.'
दिलजीत दोसांझने त्याच्या इंस्टाग्रामवर पीएम मोदींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आणि लिहिले की, 'खूप संस्मरणीय संभाषण!' व्हिडिओमध्ये दिलजीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की, 'मेरा भारत महान' असं आम्ही वाचायचो, जेव्हा मी भारतभर फिरलो तेव्हा मला समजलं की असं का म्हणतात.' यावर पीएम मोदी म्हणतात की, ‘भारताची विशालता हीच ताकद आहे. ज्यांनी योगाचा अनुभव घेतला आहे त्यांना त्याची शक्ती माहित आहे.’
या भेटीवेळी दिलजीत दोसांझने गुरु नानक यांचे एक गाणे गायले आहे. तर, पंतप्रधान मोदींनी गायकाच्या तालाशी ताल जुळवत ढोलकाप्रमाणे टेबलावर थाप मारली. नेटकऱ्यांना त्यांची ही स्टाइल खूप आवडली आहे. यावर अनेक कमेंट येत आहेत. एका मीडिया यूजरने लिहिले की, 'मोदीजी, आमच्याकडे एकच मन आहे,तुम्ही किती वेळा जिंकाल.' एकाने लिहिले, 'हा तर वेगळा क्रॉसओव्हर आहे.' एका यूजरने लिहिले की, 'तुम्हा दोघांना एकत्र पाहणे एक वेगळीच अनुभूती देत आहे.' अनेक युजर्सनी व्हिडिओवर हार्ट इमोजी बनवले आहेत. या व्हिडिओवर चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.
दिलजीत दोसांझ त्याच्या 'दिल-लुमिनाटी' म्युझिक टूरमुळे चर्चेत होता. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, २०२४मध्ये तो 'अमर सिंग चमकीला' आणि 'जट अँड ज्युलिएट ३'मध्ये दिसला होता. दिलजीतच्या आगामी चित्रपटांमध्ये 'बॉर्डर २' आहे, जो २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. याशिवाय त्याच्याकडे 'नो एंट्री २', 'सरदार जी ३' हे चित्रपट आहेत. त्याच्या चित्रपटांची आता प्रेक्षकांना आणि चाहत्यांना देखील प्रतीक्षा आहे. लवकरच त्याचे हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या