Piyush Ranade Suruchi Adarkar Wedding: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेता पियुष रानडे याच्यासोबत तिने सात फेरे घेतले आहेत. सुरुचीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने हे लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर आता चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. काही लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आता सुरुचीने स्वतः या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने तिच्या पियुषसोबतच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुरुचीने लग्न झाल्यानंतर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या लग्नाबद्दल बोलताना सुरुची म्हणाली की, 'मी आता खूप खूश आहे. माझा आनंद मी आता शब्दांमध्ये व्यक्तच करु शकत नाहीये. हा क्षण माझ्यासाठी अगदी स्वप्नवत होता.' पियुषबरोबर लग्नगाठ बांधण्यावर बोलताना सुरुची म्हणाली की, 'मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे. मी सध्या खूप आनंदी आहे. पियुष हा अतिशय काळजी घेणारा आणि भावनिक व्यक्ती आहे. मी स्वतःला खूप नशिबवान समजते की, मी पियुषबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.'
पियुष आणि सुरुचीच्या नात्याबद्दल कुणालाच काही कल्पना नव्हती. अचानक फोटो शेअर करून तिचे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुरुची म्हणाली, ‘मला माझं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. माझा स्वभावच तसा आहे. म्हणूनच मी आमच्या नात्याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. आमचा लग्न सोहळा देखील अतिशय सध्या पद्धतीने आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला आहे.’
छोट्या पडद्यावरच्या 'का रे दुरावा' या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली होती. या मालिकेत तिने साकारलेली अदितीची भूमिका सगळ्यांनाच पसंत पडली होती. सुरुची अडारकर नाटक आणि चित्रपटात देखील झळकली आहे.
संबंधित बातम्या