त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा

त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2025 09:50 AM IST

ओला आणि उबर या कंपनीची सर्विस अनेकजण वापरताना दिसतात. पण कधीकधी काही प्रवाशांना वाईट अनुभव देखील येताना दिसतो. काही अभिनेत्रींना हा अनुभव आला आणि त्यांनी धडा देखील शिकवला आहे.

Pinga Ga Pori Pinga
Pinga Ga Pori Pinga

मुंबईत किंवा मुंबई बाहेर प्रवास करण्यासाठी अनेकजण ओला आणि उबरचा वापर करतात. असाच एक अनुभव कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील अभिनेत्रींना आला आहे. या अभिनेत्रींनी स्वत: याविषयी खुलासा केला आहे. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत वेगवेगळ्या शहरांतून मायानगरी मुंबईत आलेल्या आणि एका बड्या सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या पाच मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेत ऐश्वर्या शेट्ये, विदिशा म्हसकर, प्राजक्ता परब व शाश्वती पिंपळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत त्या मैत्रिणींचा खास बॉण्ड असल्याचे पाहायला मिळतं. मालिकेत ज्याप्रमाणे या मैत्रीणी एकमेकींच्या मदतीला धावून जातात, तशा त्या खऱ्या आयुष्यातही एकमेकींना मदत करतात.

नेमकं काय घडलं होतं?

अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये, विदिशा, प्राजक्ता व शाश्वती यांनी नुकताच 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आलेला अनुभव सांगितला आहे. “यांनी गाडी बुक केली आणि इथून Uber मिळवणं खूप अवघड होतं. कारण इथे येणारा रस्ता थोडा अंधारलेला आणि आतमध्ये आहे. पण तो आला आणि थांबला. मग त्याने थोडं आगाऊ शब्दांत यांना काही तरी म्हटलं” असे ती म्हणाली.

ड्रायव्हरने शिवीगाळ केली

प्राजक्ता परबने पुढे सांगितले की, “त्याने शिवीगाळच केली. त्याने आमची Uber कॅन्सल केली. त्यानंतर त्याने अंधेरीला जाण्याचे थोडे जास्तीचे पैसे सांगितले. त्यामुळे आम्ही रागाने उतरलो आणि उतरताना मी गाडीचा दरवाजा थोड्या जोराने बंद केला. यावर तो लगेच बाहेर आला आणि त्याने धमकी देण्यास सुरुवात केली आणि तो आता बघा मी काय करतो असं म्हणाला.”
वाचा: उषा नाडकर्णी की तेजस्वी प्रकाश; सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्ये कोण घेतं सर्वाधिक फी?

पुढे विदिशा म्हणाली, “तो आमच्यावर जोरात ओरडला की, तुम्ही माझ्या गाडीचा दरवाजा जोरात का बंद केला. आता मी तुम्हाला दाखवतो आणि फोनमध्ये बघायला लागला. यानंतर मी त्याला म्हटलं की, तू आमच्याच इथे येऊन आम्हाला ही बोलतो आहेस. त्यानंतर मी लगेच प्रोडक्शनमध्ये फोन केला आणि सगळं सांगितलं. मग सगळे खाली आले. त्याला तुडवण्याच्या बेतात होते. त्यावेळी एक-दोन फटकेही खाल्ले”

Whats_app_banner