Pillu Bachelor: 'पाठक बाई'चं चित्रपटात पदार्पण; 'पिल्लू बॅचलर'मध्ये दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pillu Bachelor: 'पाठक बाई'चं चित्रपटात पदार्पण; 'पिल्लू बॅचलर'मध्ये दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

Pillu Bachelor: 'पाठक बाई'चं चित्रपटात पदार्पण; 'पिल्लू बॅचलर'मध्ये दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

Updated Nov 04, 2023 11:41 AM IST

Pillu Bachelor Marathi Movie: 'पाठक बाई' म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आता लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pillu Bachelor Marathi Movie
Pillu Bachelor Marathi Movie

Pillu Bachelor Marathi Movie: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सगळ्यांची लाडकी 'पाठक बाई' म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आता लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तसेच, या चित्रपटाची स्टारकास्ट आणि रिलीज डेट देखील समोर आली आहे. 'पिल्लू बॅचलर' या चित्रपटात अक्षया देवधर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पार्थ भालेराव, सायली संजीव, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे हे कलाकार देखील झळकणार आहेत.

हटके नाव असलेल्या 'पिल्लू बॅचलर' या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. 'पिल्लू बॅचलर' हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पिल्लू बॅचलर' हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shivali Parab: 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'तील शिवाली परब झालीय 'मासोळी ठुमकेवाली'!

विनोदी अंगानं जाणारी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या या नावावरून याचं कथानक प्रेमकथेवर आधारित असल्याचा अंदाज बांधला जात आहे. पण, तरीही कथा काय असेल यांचं कुतूहल कायम आहे. त्याशिवाय उत्तम कलाकार, दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक, उत्कृष्ट गाणी आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र, या चित्रपटासाठी प्रेक्षकांना ८ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी केली आहे. तर, श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तानाजी घाडगे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'बस्ता', 'बरड' असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी मनोरंजन विश्वाला दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Whats_app_banner