मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vinod kumawat: लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; ‘झुमकावाली पोर’ फेम अभिनेत्यावर गुन्हा दाखल

Vinod kumawat: लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; ‘झुमकावाली पोर’ फेम अभिनेत्यावर गुन्हा दाखल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2024 12:13 PM IST

Hai Jhumka Wali Por Actor Vinod kumawat: निर्माता-अभिनेता विनोद कुमावत याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून, आपले शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे.

Actor Vinod kumawat
Actor Vinod kumawat

Hai Jhumka Wali Por Actor Vinod kumawat: सध्या मनोरंजन विश्वात खान्देशी आणि अहिराणी गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता या मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘हाय झुमका वाली पोर’ या गाण्यात झळकलेला प्रसिद्ध अभिनेता विनोद कुमावत याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान विनोद कुमावत याने पीडितेशी ओळख वाढवून, तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. लग्नाचे वचन देऊन त्याने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पीडितेने आपली तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.

निर्माता-अभिनेता विनोद कुमावत याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून, आपले शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. सदर तक्रार नोंदवताना पीडितेने म्हटले की, मागील ५ महिन्याच्या काळात विनोदने आपल्याला विविध ठिकाणी नेत अत्याचार केला आणि आपल्याला मारहाण देखील केली, असा आरोप या पीडित महिलेने केली आहे. आता नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. तर, विनोद कुमावत विरोधात आता पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

Bigg Boss 17: ‘माझी चूक झाली’; अंकिता लोखंडेसोबत घटस्फोटाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलला विकी जैन!

अभिनेता विनोद कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, या पीडित महिलेने त्याच्याकडे त्याच्या पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता, तिला शिवीगाळ करून मारहाण देखील केली. तसेच तिला लग्नाचे वाचन देऊन देऊन देखील त्याने नंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोद कुमावत याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'हाय झुमका वाली पोरं' हे अहिराणी भाषेतील गाणे सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिंग आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेता विनोद कुमावत देखील लोकप्रिय झाला होता. ‘हाय झुमका वाली पोर’ या गाण्याची निर्मिती देखील विनोद कुमावत याने केली होती. आता या अभिनेत्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिकच तपास करत आहेत.

WhatsApp channel