धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!

धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!

Apr 06, 2024 08:52 AM IST

प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती, म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!
धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!

छोट्या पडद्यावर गाजलेली ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आजही प्रेक्षकांना आवडते. या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’च्या ‘गुढीपाडवा विशेष’ भागात ही जोडी एकत्र सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत झळकलेली शुभम आणि कीर्तीची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली होती. शुभम आणि कीर्तीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. शुभम हा एका लहान जो शहरातला मिठाईचे दुकान चालवणारा एक तरुण होता. तर, कीर्ती ही आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न मनाशी बाळगून पुढे प्रवास करणारी एक तरुणी होती. मात्र, नियतीच्या चक्रामुळे या दोघांचं लग्न होतं आणि कीर्तीला आपली सगळी स्वप्न सोडून घर संसार सांभाळावा लागतो. पुढे, आपल्या बायकोच्या मनात आयपीएस होण्याची इच्छा होती आणि तेच तिचं स्वप्न होतं, हे कळल्यानंतर शुभम कीर्तीला पाठिंबा देऊन, तिला अभ्यास करायला लावून एक पोलीस अधिकारी बनवतो. अशी या मालिकेची कथा होती.

तेरी झलक अशरफी... ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का? नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

पुन्हा एकत्र येणार हर्षद-समृद्धी!

प्रेक्षकांना देखील ही मालिका अतिशय जवळची वाटली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या आठवणीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू उमटते. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना छानसं सरप्राईज देण्यासाठी ही जोडी सज्ज झाली आहे. लवकरच पुन्हा एकदा शुभम आणि कीर्तीला छोटा पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. याचं निमित्त ठरलं आहे ‘स्टार प्रवाह’ वाहिनी वरचा ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ हा कार्यक्रम. प्रेक्षकांची ही जोडी या कार्यक्रमाचे एकत्र सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत शुभमची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी, तर कीर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर हिने साकारली होती.

लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर दणक्यात पदार्पण! ‘आज्जीबाई जोरात’मध्ये अभिनय बेर्डे दिसणार मुख्य भूमिकेत

‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चा गुढीपाडवा विशेष भाग!

‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करत आहेत. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकौशल्य या मंचावर पहायला मिळत आहे. स्पर्धकांसोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही जोडीने सादर होतंय. समृद्धीसोबतच इतर मालिकेतील कलाकारही सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतात. ‘मन धागा धागा’ मालिकेतील सार्थक आणि ‘साधी माणसं’ मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. समृद्धी आणि हर्षद यांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. येत्या शनिवार-रविवारी हा भाग पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner