Bollywood Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा नागिण कथेवर आधारित सिनेमे लोकांना खूप आवडायचे. बॉलिवूडमधील सर्वच बड्या नायिकांनी मोठ्या पडद्यावर नागिनची भूमिका साकारली आहे. श्रीदेवी, रीना रॉय, मनीषा कोईराला, वैजंतीमाला या नायिकांनी नागिनची भूमिका साकारली आहे. आज पहचान कौन मध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. हा चित्रपट १९५४ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटाने देशाला सर्वात प्रसिद्ध अशी नागिन धुन दिली. लग्नाच्या मिरवणुकीत आजही हा सूर ऐकायला मिळतो.
या बॉलिवूड सिनेमाचं नाव ओळखलंस का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. 'नागिन' असं या सिनेमाचं नाव होतं. या चित्रपटात वैजंतीमाला आणि प्रदीप कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट ५ मार्च १९५४ रोजी प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर sacnilk.com नुसार हा चित्रपट ४० लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. तर, या चित्रपटाने भारतात २.९० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट १९५४ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
या चित्रपटात अनेक गाजलेली गाणी होती. त्याचबरोबर या चित्रपटातच पहिल्यांदा नागिन धुन वाजवण्यात आली होती, जी खूप गाजली होती. तेव्हापासून आजपर्यंत वर्षानुवर्षे तुम्ही ही धुन ऐकत आहात. संगीतकार हेमंत कुमार आणि रवी यांनी संपूर्ण चित्रपटासाठी गाणी संगीतबद्ध केली. त्यांनीच या चित्रपटातील नागासाठी ही धुन तयार केली होती. एका मुलाखतीत रवी यांनी सांगितले होते की, त्यांनीच 'नागिन'मधील प्रसिद्ध धुन संगीतबद्ध केली होती.
नंदलाल जसवंतलाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे लेखन राजेंद्र कृष्णा, हमीद बट आणि बिजन भट्टाचार्य यांनी केले होते. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.७ आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
संबंधित बातम्या