Payavatachi Savali: गावरान गोडवा अन् लेखकाची अव्यक्त कहाणी! 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित-payavatachi savali marathi movie trailer out must watch this heart touching story on big screen ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Payavatachi Savali: गावरान गोडवा अन् लेखकाची अव्यक्त कहाणी! 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Payavatachi Savali: गावरान गोडवा अन् लेखकाची अव्यक्त कहाणी! 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aug 23, 2024 09:12 AM IST

Payavatachi Savali Marathi Movie: लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

Payavatachi Savali Marathi Movie trailer: 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Payavatachi Savali Marathi Movie trailer: 'पायवाटाची सावली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Payavatachi Savali Marathi Movie: लेखकाचा खडतर प्रवास ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच, यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार झळकणार आहेत.

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक-लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत असं म्हटलं की, ‘एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो. तेथील लोक पाण्यविना आपला उदरनिर्वाह कसा करतात. त्यांची पाण्यप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे. आयुष्यात हरलेला व स्वतःला निराशेच्या डोहात बुडवलेल्या एका लेखकाची दुर्दशा यात मांडली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल, अशी मी आशा करतो. तसेच काहींना असं वाटेल की, हे माझ्यासोबत देखील घडलं आहे. काहींना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती येईल. सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्की पहावा अशी मी आशा करतो.’

Saira Banu Birthday: मोठ्या पडद्यावरही हिट ठरली होती सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची जोडी! ‘हे’ चित्रपट पाहिलेत?

प्रसिद्ध हिंदी संगीतकाराचं मराठीत पदार्पण!

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांचे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले. याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘माझे मित्र मुन्नावर शमीम भगत यांनी माझ्यावर या चित्रपटाच्या संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी दिली. तेव्हा मला फार आनंद झाला. कारण माझे वडील अनिल बिस्वास यांनी हिंदी संगीतसृष्टीत खूप उत्तम काम केलं आणि मी आता त्यांच्या संगीताचा वारसा पुढे नेत आहे, याचा मला आनंद आहे. या चित्रपटातील गाणी सुंदर झाली आहेत. तुम्ही सर्वांनी हा चित्रपट १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.’

कधी रिलीज होणार चित्रपट?

या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास, मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक शिरीष राणे यांनी ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 'मीना शमीम फिल्म्स' प्रस्तुत 'पायवाटाची सावली' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू 'मीना शमीम फिल्म्स'ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे.