Payavatachi Savali: लेखकाच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी; 'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार अनोखी कथा!-payavatachi savali marathi movie the untold story of the author s life a unique story will unfold from the movie ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Payavatachi Savali: लेखकाच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी; 'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार अनोखी कथा!

Payavatachi Savali: लेखकाच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी; 'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार अनोखी कथा!

Aug 18, 2024 09:24 AM IST

Payavatachi Savali Upcoming Marathi Movie: लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर पाहायला मिळणार आहे.

Payavatachi Savali Marathi Movie
Payavatachi Savali Marathi Movie

Payavatachi Savali Marathi Movie: सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. अशा धार्मिक चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारं आहे. 'पायवाटाची सावली' असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतंच या नव्या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे.

'पायवाटाची सावली' हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर पाहायला मिळणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच, यात एका सुंदर गावातील जीवनशैली आणि साध राहणीमान लोकांना फार आकर्षित करणारं आहे.

कसं सुचलं चित्रपटाचं कथानक?

या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक-लेखक मुन्नावर शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत असं म्हटलं की, ‘मी या आधी ४ चित्रपटांची निर्मिती केली आहे. एक हिंदी चित्रपट ‘लाखो है यहा दिलवाले’ आणि मराठीत ‘निवडुंग’, ‘गाव पुढे आहे’, ‘उडत गेला’ हे ३ चित्रपट. ‘पायवाटाची सावली’ हा माझा ५वा चित्रपट आहे. चमत्कार कसे होतात? देव आहे की नाही? हे प्रश्न मला पडायचे यातूनच मला ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाचं कथानक सुचलं. हा चित्रपट आशयघन असून, एका लेखकाचा प्रवास उलगडणार आहे. एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या आयुष्यात हरतो, तेव्हा त्याच्यावर फार विचित्र परिस्थिती ओढवते. पण, जेव्हा तो यशाच्या शिखरावर पोहोचतो, तेव्हा त्याचा प्रवास कसा उलगडतो याचं जिवंत उदाहरण यात दर्शवलं आहे. आम्ही हा चित्रपट १३ सप्टेंबरला तुमच्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात घेऊन येत आहोत.’

मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच! सिद्धार्थ जाधवला शोसाठी बक्षिस म्हणून मिळाली कार

‘हे’ कलाकार झळकणार

'मीना शमीम फिल्म्स' प्रस्तुत 'पायवाटाची सावली' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर, चित्रपटाच्या निर्मितीची बाजू 'मीना शमीम फिल्म्स'ने सांभाळली आहे. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत बॉलिवूड मधील महान संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते करत आहेत.

विभाग