Pawan Kalyan: पहिले दोन घस्टफोट अन् तिसरे परदेशी मुलीशी लग्न; वाचा पवन कल्याणच्या खासगी आयुष्याविषयी-pawan kalyan birthday special know about his personal life ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pawan Kalyan: पहिले दोन घस्टफोट अन् तिसरे परदेशी मुलीशी लग्न; वाचा पवन कल्याणच्या खासगी आयुष्याविषयी

Pawan Kalyan: पहिले दोन घस्टफोट अन् तिसरे परदेशी मुलीशी लग्न; वाचा पवन कल्याणच्या खासगी आयुष्याविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 02, 2024 07:53 AM IST

Pawan Kalyan Birthday: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच राजकारणी देखील आहे. त्याने स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीविषयी आणि खासगी आयुष्याविषयी...

Pawan Kalyan
Pawan Kalyan

'बद्री', 'जॉनी', 'अन्नावरम', 'पुली', 'गब्बर सिंग' या सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे पवन कल्याण. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज पवन कल्याणचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट होताना दिसतो. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्य ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो. त्याची लोकप्रियता केवळ दक्षिकडेच नाही तर संपूर्ण जगभर पाहायला मिळते. आज, २ सप्टेंबर रोजी पवन कल्याणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

काय आहे खरे नाव?

अभिनेता पवन कल्याणचा जन्म २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेश येथील बपतला येथे झाला. आज त्याचा ५१वा वाढदिवस आहे.पव कल्याण हा मेगास्टार चिरंजीवी यांचा लहान भाऊ आहे. त्याचे खरे नाव कोन्निडेला कल्याण असे आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने नाव बदलून कल्याण असे ठेवले. पवन कल्याण एक अभिनेत्यासोबतच नेता देखील आहे. त्याचेकडे एकूण ११६ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.

पवन कल्याणच्या करिअरची सुरुवात

बालकलाकार म्हणून काम करत पवन कल्याणने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'गोकुलामलो सीता' या तेलुगू चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. हळूहळू पवन कल्याणची लोकप्रियता वाढत गेली. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये 'बद्री', 'जॉनी', 'अन्नावरम', 'पुली' आणि 'गब्बर सिंग' या चित्रपटांचा समावेश आहे. पवन कल्याण हा अभिनय क्षेत्रासोबतच राजकारणात देखील प्रचंड सक्रिय आहे. पवन कल्याण २००८ मध्ये प्रजा राज्यम पक्षात सहभागी झाला. काही वर्षानंतर पवनने स्वतःचा जन सेना पक्षा स्थापन केला.
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा

पवन कल्याणने केली तीन लग्न

तसेच पवन कल्याणच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने १९९७ साली नंदिनीशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी दोन वर्षातच १९९९ साली घटस्फोट घेचला. त्यानंतर पवन कल्याणने रेणू देसाईशी लग्न केले. पुन्हा त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. पवन आणि रेणू यांना एक मुलगा, मुलगी आहे. दोन मुले झाल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पवन कल्याणने तिसरे लग्न देखील केले आहे. परदेशी असलेल्या बाला अन्ना लेजनेवाशी त्याने लग्न केले. त्यांची पहिली भेट २०११ साली होती. त्यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव मार्क शंकर पवनोविच असे आहे.

विभाग