मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pavitra And Eijaz Breakup: साखरपुड्यानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडीचं लग्न मोडलं! ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाले...

Pavitra And Eijaz Breakup: साखरपुड्यानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडीचं लग्न मोडलं! ब्रेकअपबद्दल बोलताना म्हणाले...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 13, 2024 02:46 PM IST

Pavitra Punia And Ejaz Khan Breakup: एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘बिग बॉस १४’ या रिॲलिटी शोमधून झाली होती. त्यांचा हा शो संपल्यानंतरही दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले होते.

Pavitra Punia And Ejaz Khan Breakup
Pavitra Punia And Ejaz Khan Breakup

Pavitra Punia And Ejaz Khan Breakup: मनोरंजन विश्वासाठी ब्रेकअप आणि पॅचअप हे प्रकार काही नवे नाही. मनोरंजन विश्वातून नेहमीच नाती तुटल्याच्या चर्चा कानावर पडत असतात. आता देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस १४’ फेम अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया यांनी आपण एकमेकांपासून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तर, दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘बिग बॉस १४’ या रिॲलिटी शोमधून झाली होती. त्यांचा हा शो संपल्यानंतरही दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले होते. मात्र, आता ही जोडी वेगळी झाली आहे. चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता ही जोडी वेगळी झाली आहे. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Viral Video: सासू-सुनेचं प्रेम चाललंय उतू! आलिया भट्ट-नीतू कपूर यांचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

‘बिग बॉस १४’च्या घरात एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. सुरुवातीच्या काळात दोघांमध्ये खूप भांडणे झाली. मात्र, हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. इतकंच नाही तर, शो संपेपर्यंत त्यांच्या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. जवळपास चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे आता वेगळे झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एजाज खान आणि पवित्रा पुनिया पाच महिन्यांपूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले आहे.

ब्रेकअपविषयी बोलताना म्हणाले की...

अभिनेत्री पवित्रा पुनिया हिने त्यांचे नाते तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी पवित्रा पुनिया म्हणाली की, ‘प्रत्येक गोष्टीची एक शेल्फ लाईफ असते, कोणतीच गोष्ट शाश्वत नसते. नातेसंबंधांमध्येही शेल्फ-लाइफ असू शकते. एजाज आणि मी काही महिन्यांपूर्वी वेगळे झालो आहोत. मात्र, भावी आयुष्यासाठी मी त्याला नेहमीच शुभेच्छा देईन. मी त्याचा खूप आदर करते. पण आमचे हे नाते टिकले नाही.’ या ब्रेकअपविषयी बोलताना एजाज म्हणाला की, ‘मला आशा आहे की, पवित्राला ते प्रेम आणि यश मिळेल, ज्यासाठी ती पात्र आहे. तिच्यासाठी मी नेहमीच चांगल्या गोष्टी चिंतेन.’

लिव्ह-इनमध्ये राहत होती जोडी!

अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया यांचा साखरपुडा झाला होता. एजाजने पवित्राला हिऱ्याची अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज केले होते. साखरपुड्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांचे लग्न बघायचे होते. पण, आता चाहत्यांचे हे स्वप्न तुटले आहे. ‘बिग बॉस १४’ची ही जोडी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, आता अभिनेता एजाज खान त्याच्या मालाडच्या घरी परतला आहे.

WhatsApp channel